आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंशत: लाॅकडाऊन:15 दिवस भाजी खाल्ली नाही तर कुणी मरणार नाही, जाधववाडी बाजार बंदचे प्रशासकांकडून समर्थन

औरंगाबाद (प्रवीण ब्रह्मपूरकर)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मनपाचे प्रशासक अास्तिककुमार पांडेय - Divya Marathi
मनपाचे प्रशासक अास्तिककुमार पांडेय
  • ‘जबाबदारी न घेणारेच अारडाअाेरड करतात’

‘कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनीच कटाक्षाने नियम पाळणे गरजेचे अाहे. गुरुवारपासून अंशत: लाॅकडाऊन लावण्यात येणार अाहे. जाधववाडीतील भाजीमंडईत माेठी गर्दी जमत असल्याने तेथून संसर्गाचे प्रसार हाेण्याची भीती अाहे. त्यामुळेच प्रशासनाने सात दिवस हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे. काेराेनाचा संसर्ग राेखणे व लाेकांचे जीव वाचवण्यास अामचे सर्वाेच्च प्राधान्य अाहे. १५ दिवस कुणी भाजी खाल्ली नाही किंवा विकली नाही तर कुणी मरणार नाही,’ असे मत मनपाचे प्रशासक अास्तिककुमार पांडेय यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.

धूत हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर पांडेय यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘शहरात लसीकरण माेहीम जाेरात सुरू अाहे. अातापर्यंत ४० हजार लाेकांना डाेस दिले आहेत. सहा महिन्यांत साडेचार लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात सुमारे साडेचार लाख कुटुंबे राहतात. अातापर्यंत साडेचार लाख लाेकांची काेराेना चाचणी करण्यात अाली. या सर्वांना लस दिली तर शहर सुरक्षित राहू शकेल. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कठाेर कारवाई केली जाणार अाहे. एकेकाळी औरंगाबाद चाचणीत देशात एक नंबरला होते. अाताही अापण राज्यात तिसऱ्या क्रमांकावर अाहाेत,’ असा दावाही त्यांनी केला.

‘जबाबदारी न घेणारेच अारडाअाेरड करतात’
‘नागपूरमध्ये राेज दीड हजारावर तर नाशिकमध्ये दाेन हजारांवर काेराेनाबाधित सापडत अाहेत. त्या तुलनेत अाैरंगाबादेत रुग्णसंख्या कमी अाहे. अापल्याकडे जबाबदारी न घेणारे, नियम न पाळणारेच लाेक जास्त अारडाअाेरड करताना दिसतात. राज्याने “माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार’ हे अभियान सुरू केले अाहे. यातून लाेकांनीही जबाबदार व्हायला हवे. स्वत: मास्क न लावता फिरणारे प्रशासन व इतर व्यवस्थेकडे बाेट दाखवून दाेष देण्यात धन्यता मानत अाहेत,’ अशी नाराजीही पांडेय यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...