आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमांच सुरू:निकाल नाही... यजमानपदाचा गर्व ; प्रथमच यजमान देश सलामीच्या सामन्यात पराभूत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉलच्या महाकुंभात यजमान देश पहिला सामना खेळला तर एक वेगळाच रोमांच दिसतो. असेच दृश्य रविवारी दोहामध्ये पाहायला मिळाले. नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या देशांच्या जर्सी घातलेल्या फुटबॉल चाहत्यांची गर्दी दिसत होती. सामना रात्री ९.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार होता, पण चाहत्यांनी चार तास अगोदरच अल बायत स्टेडियमवर येण्यास सुरुवात केली. कतारचे काही चाहते देशाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये होते, तर काही शॉर्ट््स आणि टी-शर्टमध्ये होते.

कतार-इक्वेडोर सामना पाहण्यासाठी अनेक देशांतील चाहतेही पोहोचले होते. मात्र, ते आपापल्या देशाच्या जर्सीमध्ये होते. कतारच्या चाहत्यांना त्यांचा संघ जिंकण्याची अपेक्षा होती, परंतु यजमानांचा इक्वेडोरकडून ०-२ असा पराभव झाला. मात्र, चाहत्यांची निराशा झाली नाही. कतारचा चाहता खालिद अल मारी म्हणाला, ‘आमच्या संघाने आशियाई चषक जिंकला आहे. संघ जिंकेल अशी पूर्ण आशा होती, पण तसे झाले नाही. कतारमध्ये विश्वचषकाचे आयोजन होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. परिणाम काहीही असो, यजमानपद आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.’

मेक्सिकोच्या इस्रायल ग्युइरोचा हा दुसरा विश्वचषक आहे. तो म्हणाला, ‘मी रशिया विश्वचषकही पाहिला आहे. कतार हा छोटा देश आहे आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेईन. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मी इथे राहीन आणि खूप प्रवास करेन. जास्तीत जास्त सामने पाहणार आहे. फॅन झोन ही चांगली संकल्पना असल्याचे तो सांगतो. ज्यांना स्टेडियममध्ये जाता येत नाही ते येथे बसून सामन्याचा आनंद घेतात.

स्टेडियमच्या बाहेर ढोलसह कतारच्या संगीतकारांचे सादरीकरण कतारमधील २०-२२ संगीतकारांनी स्टेडियमच्या बाहेर ड्रम्ससह सादरीकरण केले. कतारव्यतिरिक्त इतर काही देशांतील चाहते सामना पाहण्यासाठी आले होते, जे येथे केलेल्या व्यवस्थेमुळे खूप खुश दिसत होते. अर्जेंटिनाचे मॅथाइस अरेन्सिबिया व डॅमियन माउझो हे ब्युनोस आयर्सहून २ दिवस लवकर दोहाला पोहोचले. तो म्हणाला, ‘आम्ही शेवटचा विश्वचषक रशियात पाहिला. रशियाच्या तुलनेत कतार हा खूप छोटा देश आहे, पण इथली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्यवस्था उत्तम आहे. वाहतुकीपासून निवासापर्यंत सर्व काही चांगले आहे, एवढा छोटा देश असूनही कतार इतके उत्तम व्यवस्था करेल.

बेकहॅमची स्वाक्षरी असलेली जर्सी ६.५ लाख रुपयांची कतार विश्वचषकादरम्यान अधिकृत साहित्यांची विक्री सुरू झाली आहे. विश्वचषकादरम्यान अधिकृत साहित्यांवर ऑफर देणारी अनेक आऊटलेट आहेत. कतार विश्वचषक ब्रँड अॅम्बेसेडर डेव्हिड बेकहॅमने स्वाक्षरी केलेल्या मँचेस्टर युनायटेडच्या जर्सीपासून ते ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले, नॉर्वेचा युवा स्ट्रायकर एर्लिंग हॉलंड आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मेसीपर्यंत या सर्वांच्या येथे जर्सी आहेत. बेकहॅमच्या जर्सीची किंमत सुमारे ६.५ लाख रुपये आहे. मेसीने स्वाक्षरी केलेले बूट बेकहॅमच्या जर्सीच्या अर्ध्या किमतीत मिळू शकतात, ज्याची किंमत सुमारे ३.५ लाख रुपये आहे. अधिकृत यादीतील सर्वात मौल्यवान वस्तूमध्ये मध्य पूर्वेतील डिझाइन आणि विश्वचषकाचा लोगो असलेली काळी आणि सोन्याची स्मरणार्थी प्लेट. त्याची किंमत २ लाख रुपये आहे. येथील ५५,००० रुपयांचा कॉफी सेटदेखील चर्चेत आहे, ज्यामध्ये कॉफी पॉट व ६ कप आहेत.

बातम्या आणखी आहेत...