आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम:नो स्टॉकचा बोर्ड लावावा; पंपचालकांना आता कोटा निश्चितीचा नवीन नियम

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल, डिझेलचा पुरवठा कमी झाल्याने अनेक पेट्रोल पंप ड्राय होत आहेत. अशा परिस्थितीत ऑइल कंपन्यांनी पंपचालकांसाठी कोटा निश्चितीचा नवीन नियम अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी काळात शहरात कृत्रिम टंचाई भासण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात तसेच राज्यातील विविध भागातील पंपचालकांना मागणीनुसार पुरवठा होत नाही. सध्या २५ टक्केपेक्षा अधिक पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा कमी करण्यात येत आहे.

यामुळे अनेक पंपचालकांना नो स्टॉकचा बोर्ड लावावा लागत आहे. ऑइल कंपनीकडून घेतलेल्या निर्णयामध्ये एका पंपावर सामान्य दिवसात किती लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे याची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. याचा वापर करून संबंधित पेट्रोल पंपावर किती पेट्रोल लागत आहे याचा कोटा निश्चित केला आहे. हा कोटा एखाद्या पंपचालकाने पार केल्यानंतर त्याला पुढील पेट्रोल दिले जात नाही. हा नियम सध्या उत्तर महाराष्ट्रात लागू केला आहे. हा निर्णय औरंगाबाद व मराठवाड्यातील पंपचालकांना लागू केला जाईल अशी शक्यता आहे. पूर्वी विक्री वाढवा तर आता कमी करा असा संदेश कंपनीच्या निर्णयामुळे समोर येत आहे. हा निर्णय औरंगाबादसह जिल्ह्यातील पंपचालकांना ठरवल्यास, पंपचालकांना सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागेल, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...