आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:गेल्या 3 वर्षापासून कल चाचणीच नाही; मग विद्यार्थी कल ओळखयचा कसा?, विद्यार्थी- पालकांना करिअर पर्याय निवडण्यात अडचण

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज प्रत्येक घरात दहावी-बारावी नंतर काय करायचे असा प्रश्न असतो. विशेषत: दहावी नंतर कला, वाणिज्य विज्ञान या व्यतिरिक्त कोणत्या शाखा आहेत. फक्त डॉॅक्टर इंजिनिअर असे नाही तर इतरही क्षेत्र मुलांसाठी उपलब्ध आहेत.

याची जाणीव कल चाचणीद्वारे केली जात असे. परंतु गेल्या तीन वर्षापासून कोरोनानंतरही कलचाचणीच होत नसल्याने आता विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे ? का फक्त गुणांच्या फुगवट्यावरच प्रवेश असा प्रश्न असून, पालक आणि विद्यार्थी देखील पर्याय निवडण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात खासगी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी घेण्यात येते होती. याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाने 2016 पासून दहावीच्या विद्यार्थ्यां व पालकांना मदत व्हावी मुलांचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे. हे शाळेतच कळाल्यावर त्यांना करिअर निवडण्यासाठी सुलभ व्हावे या हेतूने कलचाचणीचा उपक्रम सुरु केला होता. कलचाचणीचा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरण ठरवायचे. तर कल चाचणीची अंमलबजावणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत होती. सन 2015-16 मध्ये राज्यात प्रथम ही चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी दहावीच्या 15 लाख 47 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

त्यावेळी पाच क्षेत्रीय अभिरुची कसोटी तर सन 2016-17 मध्ये बहिःस्थ विद्यार्थ्यांसह साडे सोळा लाख विद्यार्थ्यांनी सात क्षेत्रीय मानसशास्त्रीय अभिरुची कसोटी म्हणजेच कलचाचणी दिली होती. ही चाचणी त्या त्या विषयातील तज्ज्ञांच्या सूचनांनुसार विकसित करण्यात आली होती. कल चाचणीनुसार कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचे मापन केले जात होते. तीन वर्ष ऑनलाईन चाचणी घेण्यात आली. 2018-19 मध्ये या चाचणीसोबत श्यामची आई फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग व व्यवसाय मार्गदर्शन तसेच मानशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली अभिक्षमता चाचणी विद्यार्थी मोबाईल अँप द्वारे घेण्यात आली होती. परंतु आता बोर्डच घेत असलेल्या कलचाचणी न झाल्याने करिअर पर्याय निवडण्यात अडचणी दिसून येत आहे. कल ओळखयचे सोडून सर्व घेतात. म्हणून आपणही प्रवेश घ्यावा, खोट्या प्रतिष्ठेसाठी झेपत नसणारे विद्यार्थी देखील नको ती शाखा पालकांच्या दबावामुळे निवडत असल्याने विद्यार्थी पुढे पेच निर्माण झाला आहे.

एसएससी बोर्ड विभागीय प्रभारी अध्यक्ष अनिल साबळे म्हणाले की, कोरोनापासूनच कलचाचणी बंद झाली आहे. ज्या व्होकेशनल विभागाकडून ही चाचणी घेतली जात होती. त्यातील अधिकारी निवृत्त झाल्यानंतर ती पदेही राहिली नाही. आता तर प्रादेशिक विद्याप्राधिकरणमध्येच समुपदेशनालाही जोडण्यात आले. तेंव्हापासूनच कलचाचणी झालेली नाही ते देखील कारण आहे.