आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृतीचा अभाव:स्वयंसेवी संस्थांनी 32 लाख खर्चून उभारलेली गॅसदाहिनी वापराविना ; गॅस दाहिनी नाकारत असल्याचे मत

औरंगाबाद / रोशनी शिंपी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाऊन आणि औरंगाबाद फर्स्ट यांनी १५ महिन्यांपूर्वी दिलेल्या ३२ लाखांच्या गॅसदाहिनीत आतापर्यंत फक्त ८ मृतदेहांचेच दहन झाले. एकीकडे या दाहिनीबद्दल जनजागृती होत नसल्याने प्रतिसाद अत्यल्प आहे, तर दुसरीकडे जून महिन्यापासून ब्रिकेट्स देऊनही त्याचा वापर तेथे झालेला नाही. मात्र, शहरातील इतर स्मशानभूमींत ब्रिकेट्सचा वापर सुरू झाला आहे. कैलासनगर स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तेथे सर्वाधिक अंत्यविधी होतात. त्यामुळे दोन्ही संस्थांनी मिळून २० ऑगस्ट २०२१ रोजी गॅसदाहिनी सुरू केली. सुरुवातीला चिमणीतून निघालेला धूर नागरिकांना त्रासदायक झाला होता. त्यामुळे दाहिनीच्या चिमणीची उंची ५० फूट केली. यामुळे धूराचा त्रास पुर्णपणे बंद झाला.

मुंबई-पुण्यात होतात, मग इथे का नाही? मुंबई-पुण्याच्या धर्तीवर आम्ही ३२ लाख खर्चून गॅसदाहिनी लावली, पण १५ महिन्यांत फक्त आठ बेवारसांवर त्यामध्ये संस्कार झाले. स्मशानजोग्याला लाकडात पैसा मिळतो, गॅस दाहिनीत मोफत अंत्यसंस्कार करावे लागतात. - संजय मंत्री, अध्यक्ष, लायन्स क्लब औरंगाबाद मिडटाऊन

ब्रिकेट्सचीही व्यवस्था आहे कैलासनगर सर्वाधिक अंत्यविधी होत असलेली स्मशानभूमी आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने गॅसदाहिनी वापरणे महत्त्वाचे आहे. जून महिन्यापासून या ठिकाणी आम्ही ब्रिकेट्सही दिले आहेत. - डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य अधिकारी, मनपा

बातम्या आणखी आहेत...