आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च:उत्तर Vs दक्षिण; 3 प्रमुख मुद्द्यांवर उत्तर भारतातील 12 व  दक्षिण भारतातील 5 प्रमुख राज्यांत 12 महिन्यांमध्ये असे बदलले चित्र

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगार; केरळमध्ये सर्वाधिक ८५%, हरियाणात ४८% एका वर्षातील वृद्धी
नवी दिल्ली | जुलै २०२२ मध्ये देशभरात संघटित क्षेत्रात १८.२३ लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. २१ जुलैमध्ये त्या १४.६४ लाख होत्या. ईपीएफओच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली. त्यापैकी १६.०२ लाख नोकऱ्या फक्त १६ राज्यांमध्ये मिळाल्या. त्यापैकी १२ उत्तर आणि ५ राज्य दक्षिण भारतातील आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ८५% वाढ झाली आहे (जुलै २०२१ मध्ये १३,४४१ वरून जुलै २२ मध्ये २४,३८०) बंगाल ७०% वाढीसह दुसऱ्या तर हरियाणा ४८% सह तिसऱ्या स्थानावर आहे.

-जुलै २१ च्या तुलनेत जुलै २२ मध्ये बिहारमध्ये ४१%, ओडिशामध्ये ३६%, यूपी-राजस्थानमध्ये प्रत्येकी २९%, महाराष्ट्रात २७%, मध्य प्रदेशात १९%, झारखंडमध्ये १०%, छत्तीसगडमध्ये ७%, ६% पंजाबात, गुजरातमध्ये २% नोकऱ्या वाढल्या. -राेजगार या कालावधीत तामिळनाडूमध्ये १९%, कर्नाटकात १०%, तेलंगणात ४१% आणि आंध्र प्रदेशात ३७% वाढला. जुलै 2022 मध्ये महाराष्ट्रात 3.8 लाख नोकऱ्या मिळाल्या. त्या देशात सर्वाधिक.

बेरोजगारी; उत्तरेकडे बिहार, दक्षिणेला तेलंगणात सर्वाधिक वेगाने वाढ हरियाणामध्ये, संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये जुलै २०२२ मध्ये सर्वाधिक वाढ झाली. परंतु तेथे २२ जुलैमध्ये बेरोजगारीचा दर २६.९% होता, जो १५ राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. जुलै २०२१ च्या तुलनेत उत्तर भारतात बिहार (५.८%) आणि दक्षिणेत तामिळनाडूत (१.८%) बेरोजगारीचा दर सर्वाधिक वाढला. राजस्थानात बेरोजगारीचा दर जुलै २०२२ मध्ये १९.०६% होता, परंतु जुलै २०२१ च्या तुलनेत तो १.५% पर्यंत कमी झाला. केरळमध्ये सुमारे ११% ची सर्वात मोठी घसरण दिसून आली. ताे १५.८ % वरून ४.९% पर्यंत घसरला आहे.

उत्तर भारतात १२ पैकी ८, दक्षिणेत 3 राज्यांमध्ये बेरोजगारी झाली कमी -जुलै २१ च्या तुलनेत जुलै २२ मध्ये महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशात बेरोजगारी दर कमी झाला. गुजरात, पंजाब, बिहारचा वाढला. झारखंडचा ९.४% वरून १४% पर्यंत वाढला. -जुलै २०२१ च्या तुलनेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळचा बेरोजगारीचा दर घटला, तर कर्नाटक, तेलंगणामध्ये वाढला. छत्तीसगड (०.८%) नंतर ओडिशा (०.९%) सर्वात कमी बेरोजगारीचा दर आहे.

महागाई; राजस्थानात सर्वाधिक वाढ आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक घट गेल्या वर्षभरात देशातील १५ प्रमुख राज्यांपैकी राजस्थानमध्ये सर्वाधिक महागाई आहे. ती जुलै २०२१ तील ४.०७% वरून जुलै २०२२ मध्ये २.८६% ने वाढून ६.९३% झाली. पश्चिम बंगाल २.१६% वाढीसह दुसऱ्या स्थानावर हाेता. त्याच वेळी दक्षिणेकडील राज्यांमध्ये कर्नाटकात महागाई दर (-१.९८%) ने सर्वाधिक कमी झाला. तो जुलै २०२१ मधील ६.८४% वरून जुलै २०२२ मध्ये ४.८६% पर्यंत घसरला. बिहार हे एकमेव राज्य राहिले जेथे जुलै २०२१ च्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये महागाईचा दर बदलला नाही.

तेलंगणात महागाई दर सर्वाधिक, तामिळनाडूमध्ये सर्वात कमी - उत्तर भारतात १२ राज्यांपैकी पंजाब, झारखंड आणि बिहार वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये वर्षभरात महागाईचा दर वाढला. गुजरातमध्ये सर्वाधिक महागाई दर ७.८५% आहे. बिहार आणि महाराष्ट्रात सर्वात कमी ५.२१% आहे. - त्याच वेळी, गेल्या १२ महिन्यांत ५ पैकी ३ (तेलंगणा, आंध्र, केरळ) राज्यांत महागाई वाढली. तामिळनाडू, कर्नाटकात कमी झाली. तथापि, केरळमध्ये सर्वात अल्प ०.४८% च वाढली आहे.

ही १७ राज्येच का? या १७ राज्यांचे विश्लेषण यासाठी, कारण ते देशातील लोकसंख्येच्या ९६% आणि एकूण क्षेत्रफळाच्या ८१% आहेत. या स्थितीत ते संपूर्ण देशाचे खरे चित्र दाखवतात. त्यात उत्तर भारतातील १२ (मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा) व दक्षिणेची ५ (तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व केरळ) यांचा समावेश आहे.