आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीचांकी घसरण:उत्तरेतील हवेचा वेग वाढला; तापमान 10.4 अंश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेतील अतिशीत वारे वेगाने आपल्याकडे वाहून येत आहेत. आर्द्रतेतही २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. परिणामी मंगळवारी किमान तापमानात १०.४ अंश नीचांकी घसरण झाली. सोमवारी ते १४.४ अंशांवर होते. पावसाची स्थिती निवळली आणि सलग सहा दिवसांपासून तापमानात घसरण होत आहे. त्यामुळे पुन्हा बोचऱ्या थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सरासरीच्या तुलनेत एका अंशाने रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. दिवसाचे तापमान दोन अंशांनी जास्त राहून ते ३०.६ अंश सेल्सियस होते. दुपारच्या सत्रात मात्र, उकाडा जाणवत असून रात्री थंडी वाजत आहे.

बातम्या आणखी आहेत...