आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज सुरू करण्याचा निर्णय नाहीच:येत्या 1 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर विचार, ऑफलाइन की ऑनलाइन याचा अद्याप निर्णय नाही; उच्च शिक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालय, कॉलेजेस सुरू होणार असे मी कधीही म्हटले नाही, तर नोव्हेंबरपासून अकॅडमिक वर्ष सुरू होणार आहे असे सांगितले असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आम्ही कोरोना परिस्थितीचा आढावा घेतोय, वाढलेल्या रुग्णसंख्येचा आढावा घेतोय आणि त्यानंतरच नोव्हेंबरमध्ये रिव्ह्यू घेऊन शाळा-कॉलेजेस उघडण्याबाबत खासकरून कॉलेज उघडण्याबाबतबाबत निर्णय घेऊ, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत मी अथवा मुख्यमंत्री अथवा टास्क फोर्स यांच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. सगळे योग्य आणि व्यवस्थित होत असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. उदय सामंत औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद संपला- उदय सामंत

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून आम्ही कुठलीही श्रेयवादाची लढाई करत नाही किंबहुना विमानतळासाठी प्रयत्न कोणी केले. हे सिंधुदुर्गच्या जनतेला माहित आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल पाळणं हे महत्त्वाचं असतं हेही सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असे उदय सामंत म्हणाले. देशाच्या नागरी उड्डाण मंत्र्यांनीच थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि नऊ तारखेच्या उद्घाटनासाठीची वेळ घेतली असंही मी ऐकले आहे. त्यामुळे आता उद्घाटनाचा विषय संपला आहे. वरिष्ठांना प्रोटोकॉल कळतात आणि त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केला आहे, असंही उदय सामंत म्हणाले. त्यामुळे आता उद्घाटनाचा वाद संपला आहे. उद्घाटन नियोजित वेळेत होणार असं त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...