आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा केंद्र:आसनव्यवस्था करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही ; विजयेंद्र काबरा महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा केंद्रातील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर विद्यापीठाने केंद्रावर अतिरिक्त विद्यार्थी वर्ग केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे संबंधित महाविद्यालयाचे म्हणणे आहे. तसेच महाविद्यालयाला अतिरिक्त विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळे एकाच बाकावर दोन किंवा तीन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी परीक्षा १ जूनपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तर २ जूनपासून बीए, बी. काॅम, बीएस्सीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली होती . पहिल्याच दिवशी शहरातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी जमा झाल्याने गोंधळ उडाला. एका बाकावर तीन परीक्षार्थी बसलेले आढळून आले. एका रूममध्ये क्षमतेपेक्षा अधिक परीक्षार्थी बसवल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्य शासनाने, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश देत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले. तसेच विद्यापीठ, महाविद्यालयाकडून अहवाल मागवले. यावर प्रत्येक परीक्षा केंद्रावर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तत्काळ परीक्षा केंद्र रद्द केल्याचे विद्यापीठाने सांगितले.

अतिरिक्त विद्यार्थी वर्ग केल्यानेच झाली समस्या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी १,५८० प्रवेश क्षमता असल्याचा दावा करत १,१८० विद्यार्थी महाविद्यालयाकडे वर्ग केल्याचे विद्यापीठाने अहवालात म्हटले आहे. महाविद्यालयाकडे क्षमता होती तर एका बाकावर तीन परीक्षार्थी कसे, एका वर्ग खोलीत एवढे परीक्षार्थी कसे बसवले? याप्रकरणी कारवाईबाबतही विद्यापीठाने अहवालात स्पष्ट केले नाही. परंतु, महाविद्यालयाचे संचालक, अध्यापकांसोबत झालेल्या तोंडी चर्चेनुसार व संबंधितांनी सादर केलेल्या लेखी निवेदनाप्रमाणे अतिरिक्त विद्यार्थी वर्ग केल्याने आसनव्यवस्था करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...