आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Not Only The Required Permission For Corona Vaccination For The Educational Trip, But Also The Vaccination Information Should Be Given To The Schools By The Education Department

शैक्षणिक सहलीसाठी कोरोना लसीकरण आवश्यक:परवानगीच नव्हे तर लसीकरणाची माहिती शिक्षण विभागास शाळांना द्यावी लागणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी सुटीनंतर शाळांमध्ये शैक्षणिक सहलींना सुरुवात होते. या सहलीसाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक आहे. सहलीसाठीच्या नियमात कोणतेही बदल नाहीत परंतु यंदा केवळ परवानगीच नव्हे तर किती विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे. याची माहिती देखील शिक्षण विभागास शाळांना द्यावी लागणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. तसेच सार्वजनिक आणि शैक्षणिक सहली देखील विद्यार्थी सुरक्षितात लक्षात घेता बंद होत्या. त्यांना परवानगी नव्हती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि लसीकरणामुळे सर्व काळी सुरुळीत करण्यात आले आहे. सामान्यपणे सर्व व्यवहार सुरु झाले आहे. त्यामुळे दोन वर्षापासून बंद असलेल्या शैक्षणिक सहलींचे आयोजन यंदा दिवाळीच्या सुटीनंतर शाळांनी सुरु केले आहे. अद्याप शाळांकडून परवानगीसाठी प्रस्ताव आलेले नाही. परंतु दिवाळीच्या सुट्या संपल्यावर शाळांकडून प्रस्ताव येण्यास सुरुवात होईल. तेंव्हा शाळांनी शैक्षणिक सहलीसाठी नियमित असलेले सर्व नियम पाळतांना परवानगी घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

किती विद्यार्थ्यांनी पहिला आणि आणि विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याची माहिती सादर करणे आवश्यक आहे. यासंदर्भात लवकरच पत्र काढूनही सूचना दिल्या जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने ही खबरदारी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

12 ते 18 वयोगटातील लसीकरणाची स्थिती

औरंगाबाद जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस 115612 जणांनी घेतला आहे. ही एकूण टक्केवारी 84 टक्के आहे. तर दुसरा डोस 69775 जणांनी घेतला असून एकूण 50 टक्केच मुलांचा दुसरा डोस झाला आहे.

अशी आहे 14 ते 18 वयोगटातील लसीकरणाची स्थिती -

जिल्हयातील 12 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये पहिला डोस 143803 असे एकूण 67 टक्के जाणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 992668 असा एकूण 46 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...