आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट मारण्याऐवजी लढवली अशी क्लृप्ती:मेहनतीची रक्कम न दिल्याने तरुणाने चक्क बाॅम्ब तयार करुन ठेवला मित्राच्याच घरासमोर!

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपुर्वी सोबत केलेल्या कामाच्या व्यवहारातील काही रक्कम मित्राने न दिल्याच्या रागातून एकाने घरच्या घरी चक्क आईडी बाँम्ब तयार केला आणि त्याच मित्राच्या घरासमोर ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे थेट मारले तर खूनाचा गुन्हा दाखल होईल हा गुन्हा टाळण्यासाठी या 'अवलीया'ने हा 'प्रताप' केला!

माजली होती खळबळ

दोन दिवसांपुर्वी कन्नड शहरात हा बाँंम्ब सापडल्याने मोठी खळबळ माजली होती. कन्नड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत या आईडीचे कोडे उलगडले. याप्रकरणी रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (26) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये होता बाॅंम्ब

9 जुन रोजी सकाळी कन्नड शहरातील मुख्य मार्गावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये इप्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (I.E.D) मिळुन आला होता. पाईप व स्फोटकांच्या मदतीने त्याची बांधणी केलेली होती. या घटनेचे संपूर्ण कन्नड तालुक्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती कळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकांने तत्काळ धाव घेतली असता स्फोटक जीवंत असल्याचे निष्पन्न झाले.

नष्ट केला बाँम्ब

अत्यंत बारकाईने काळजी घेत सदर आईडी निर्जनस्थळी नेऊन नष्ट करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,अपर पाेलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एटिएस च्या अधिकाऱ्यांनी देख्रील घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलिसांनी असे जुळवले धागे

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. यात पोलिसांनी तांत्रिक तपास व स्थानिकांची चौकशी केली. किरण राजगुरू यांच्या दुकानासमोर आईडी सापडल्याने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यात त्यांचे काही महिन्यांपूर्वी त्यांचा चुलतभाऊ दिनेश राजगुरू यांच्यासोबत आर्थिक व्यवहार असल्याचे समोर आले. त्यात रामेश्वरने दिनेशकडे असलेले पैसे काढून देण्यासाठी किरणकडे विनंती केली होती. मात्र, त्याने रामेश्वरला थारा दिला नाही.

तो पेटला होता ईर्षेने

किरणने प्रतिसाद न दिल्याने ​​​​​​​राग मनात धरुन रामेश्वरने विचार केला की, दिनेश व किरण यांना थेट मारले तर पोलिसांकडे गुन्हा दाखल होईल म्हणून त्याने ्रघरच्या घरी आईडी तयार केला. त्याचे हिवरख्रेडा येथे न्यु स्वराज इलेक्टीकल व रुद्रा रेफ्रिजेशनचे दुकान आहे. त्यामुळे त्याला बऱ्यापैकी त्याची माहिती असल्याने तो दोघांना इजा पाेहोचवण्याच्या उद्देशाने तयार केला व रात्रीतून किरण यांच्या दुकाना समोर ठेवला.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांच्या चार पथकांनी मात्र दोन दिवसात तांत्रिक तपास करत त्याला पुराव्यांसह अटक केली. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे सहकलम 3, 4 व 5 स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्ष्रक रविंद्र तळेकर, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदिप ठुबे, सतिष बढे,,सय्यद झिया, गजानन लहासे, संजय काळे, नामदेव सिरसाठ, विठ्ठल राख, लहु थोटे, नदीम शेख, गणेश गांगवे, नरेंद्र खंदारे, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे यांनी हि कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...