आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोरकीन:‘त्या’ महिलेची आत्महत्या नसून पतीकडून खून

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील कारकीन येथे मंगळवारी बानोबी शहाजान शहा (३०, रा. कारकीन ) आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा अल्तमश शहा यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आला होता. सुरूवातीला ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र ही आत्महत्या नसून अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीनेच आपल्या पत्नीसह चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहाजान छोटेमिया शहा ( रा. कारकीन ) असे आरोपीचे नाव आहे. घटना उघडकीस आल्यापासून आरोपी पती फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता.

बातम्या आणखी आहेत...