आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ना टफ, ना सोपा... पण प्रत्यक्ष वर्गातील तासाचीजाणीव करून देणारा होता फिजिक्सचा पेपर

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परीक्षेत गुरुवारी फिजिक्स विषयाचा पेपर मॉडरेट पद्धतीचा म्हणजे ना सोपा, ना अवघड असा होता. परंतु प्रत्यक्ष वर्गात तास होत असताना आपण जे शिकतो, ते ऑनलाइनमध्ये शक्य नाही याची जाणीव पेपर सोडवताना झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी १०.३० ते २ या वेळेत बारावीचा फिजिक्सचा पेपर होता. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आजवर फिजिक्स विषय खूप अवघड जात असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. परंतु गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. नियमित वर्गात होणारी तासिका यंदा ऑनलाइन पद्धतीनेच अधिक वेळ झाली. यामुळे प्रत्यक्ष वर्गात शिकून शिक्षकांना प्रश्न-उत्तरे विचारण्याची सोय नव्हती. त्यामुळे यंदाचा फिजिक्सचा पेपर कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष होते. कोरोनामुळे दरवर्षीपेक्षा यंदा काठिण्य पातळी फार नव्हती. ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांना पेपर अगदीच सोपा गेल्याचे शिक्षकांनी सांगितले. पेपरला २८ हजार ८१४ विद्यार्थी उपस्थित होते, तर ९२७ विद्यार्थी अनुपस्थित होते.

एप्रिलमध्ये अकरावीची परीक्षा
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता अकरावीच्या परीक्षांचे नियोजन महाविद्यालयांकडून करण्यात आले असून त्या एप्रिलच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येतील, अशी माहिती महाविद्यालयांनी दिली आहे. महाविद्यालयाच्या नियोजनानुसार अकरावीच्या परीक्षा घ्याव्यात, असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी कळवले आहे.

नियमित सराव करणाऱ्यांना सोपा
फिजिक्सचा पेपर मॉडरेट म्हणजे ना सोपा, ना अवघड अशा पद्धतीचा होता. ज्या विद्यार्थ्यांनी नियमित सराव आणि पुस्तक वाचन केले त्यांना पेपर चांगला गेला. सामान्य विद्यार्थी सोडवू शकेल अशीच प्रश्नपत्रिका होती. मात्र ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन अधिक चांगले असल्याची भावना विद्यार्थ्यांनी शिक्षकांजवळ व्यक्त केली. - आर. बी. गरुड, फिजिक्सचे शिक्षक

बातम्या आणखी आहेत...