आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:जि.प.च्या ११९ कर्मचाऱ्यांना नोटिसा; कार्यालयीन वेळे संपण्यापूर्वीच घरी जाणे आले अंगलट

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी घेतलेल्या झाडाझडतीत कार्यालयीन वेळ संपण्याआधीच घरी पळणारे ११९ कर्मचारी सापडले असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासकीय कार्यालयांची उपस्थिती जेमतेम होती. सोशल आणि फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठीच्या सुविधेचा कर्मचाऱ्यांनी मात्र याचा चांगलाच वेळगा स्वअर्थ काढला. कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यावर खबरदारी म्हणून जि.प. कार्यालय पाच दिवस बंदही ठेवण्यात आले होते. परंतु नंतर कार्यालयांमध्ये १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तरीही अनेक कर्मचारी कार्यालयांमध्ये वेळेत येत नाही. तसेच घरी कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच लवकर जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता अचानक अनेक विभागांची झाडाझडती घेतली. कार्यालयीन वेळ ६.१५ वाजेपर्यंत असताना जवळपास ११९ कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. यामध्ये शिक्षण विभागातील ३५, आरोग्य ३५, बांधकाम १२, वित्त २१, सिंचन १० आणि कृषी विभागात ६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर आता पुन्हा असा प्रकार दिसल्यास कडक कारवाई करण्ण्यात येईल असेही बनसोडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...