आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:‘मॉक ड्रिल’ प्रकरणी कोर्टाची महासंचालक,गृह विभागाला नोटीस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलाकडून अतिरेकी हल्ल्याच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून सराव (मॉक ड्रिल) केला जातो. सराव करताना अतिरेकी हा मुस्लिम धर्माचा असतो असे गृहित धरूनच मॉक ड्रिल केली जाते. यासंदर्भात अॅड. सय्यद कौशिक यासीन यांच्यामार्फत ओसामा अब्दुल कबीर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

यामध्ये सुनावणी होईपर्यंत मुस्लिम समाजाला दहशतवादी म्हणून चित्रित करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...