आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्यांविरोधात आंदोलन:राज ठाकरेंचे पत्र वाटण्यापूर्वीच जिल्हाध्यक्षांना नोटीस; धार्मिक भावना दुखावणार नाही याची दक्षता

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन छेडल्यानंतर पुण्यातील शेवटच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सामान्य नागरिकांना उद्देशून पत्र लिहिणार असल्याचे जाहीर केले होते. ते पत्र वाटपापूर्वीच पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना तंबीची नोटीस दिली. भोंग्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन करणारे पत्र घरोघरी पोहोचवण्याची सुरुवात जवाहर कॉलनीतील दुर्गामाता मंदिरातून करण्याची तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. याची माहिती मिळताच जवाहरनगर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सीआरपीसी कलम १४९ नुसार जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह इतरांना नोटीस पाठवली.

पत्र वाटपाने कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नोटिसांचा काहीही परिणाम होणार नाही. पत्र वाटप सुरूच राहील, असे खांबेकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...