आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली येथील २६ वर्षीय तरुणाच्या गूढ मृत्युप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती भारत पी. देशपांडे यांनी प्रतिवादी राज्याचे गृहसचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, पोलिस अधीक्षक, हिंगोली आदींना नोटीस देत याचिकेतील आरोपांविषयी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी हिंगोली येथील मस्तान शहानगरातील पठाण इस्माईल खान यांनी ॲड. सईद एस. शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केलेली आहे.
पठाण यांचा विवाहित मुलगा इरफान खान यास ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता भरत शंकर यादव, रोहित राजू यादव, सोमनाथ ऊर्फ अक्षय अशोक चंदनशिव आणि विठ्ठल विष्णू चंदनशिव यांनी पार्टी करण्यासाठी साेबत नेेले. त्यानंतर इरफान घरी परतला नसल्याने १ आॅक्टाेबर रोजी याचिकाकर्त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी हिंगोलीपासून २० किमीवर असलेल्या सोडेगाव/सालेगाव भागातील कयाधू नदीत इरफानचा अर्धनग्न मृतदेह आढळला. तेव्हापासून याचिकाकर्ते गुन्हा दाखल करण्याची विनंती करत आहेत. मात्र राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल होत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर सुनावणीनंतर प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली. प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै २०२२ रोजी ठेवली आहे. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी बाजू मांडली. -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.