आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य:औरंगाबाद खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांना नोटीस

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी धाव घेतली आहे.

इंदुरीकर यांच्या विरोधातील तक्रार रद्द करू नये अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली असून खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी आता आठ आठवड्यानंतर ठेवली आहे.

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करत असताना स्त्रीभ्रूणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते त्या अंतर्गत त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात प्रोसेस इशू केली होती याविरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेश रद्द केले होते. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ऍडव्होकेट जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. यावर खंडपिठाने मंगळवारी इंदुरीकर महाराज व अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे नाटीस काढली आहे.

बातम्या आणखी आहेत...