आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पादचाऱ्यांना वाहतूक पाेलिस करणार मदत:आकाशवाणी चाैकात रस्ता ओलांडण्यासाठी आता 35 सेकंदांचा वेळ

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशवाणी चौकातील सिग्नलमध्ये अंशत: बदल करून पादचाऱ्यांसाठी वेळ वाढवण्यात आला आहे. आधी दर ३ मिनिटाला १५ सेकंदांसाठी वाहतूक थांबवून रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला जात होता. मागील काही दिवसात बॅरिकेड्सला वाढत्या विरोधानंतर आता वाहतूक पोलिसांनी यात बदल करत दर १०५ सेकंदानंतर ३५ सेकंदांसाठी वाहतूक थांबवून रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील वाहनांची वाढती संख्या व त्या तुलनेत अरुंद रस्त्यांमुळे जालना रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत होता. मनपाकडून यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने पोलिसांनी अमरप्रीत व आकाशवाणी चौक बॅरिकेड्स लावून बंद केले. त्यामुळे वाहने सरळ पुढे जात असल्याने या चौकात रस्ता ओलांडणाऱ्यांसाठी दर तीन मिनिटाला १५ सेकंदांसाठी वाहतूक थांबवली जात हाेती. पोलिसांनी त्याचे नियमनदेखील केले. मात्र, लांबून वळण घ्यावे लागत असल्याची तक्रार नागरिक, व्यापाऱ्यांनी सुरू केल्याने या निर्णयाला विरोध सुरू झाला.

लोकांनी केल्या ईमेलवर तक्रारी १४ नोव्हेंबर रोजी जवाहरनगर कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी ई-मेलवर तक्रारी केल्या. त्यात सचिन बोरसे यांच्या तक्रारीला उत्तर देताना पोलिसांनी ही माहिती दिली. त्यानुसार, टू वे फ्री करिता (वाहतूक सरळ वाहण्यासाठी) १०५ सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. प्रत्येक १०५ सेकंदांनंतर वाहतूक थांबवून रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिस मदत करतील.

लाल सिग्नल लागताच बाहेरगावचे वाहनचालक थांबतात, त्यामुळे गाेंधळ { वाहनचालक एसएफएस शाळेसमोरून आकाशवाणी चौकाकडे जाताना व मोंढा नाक्याकडून आकाशवाणी चौकाकडे जाताना बॅरिकेड्स बंद असल्याचे पाहून सरळ पुढे निघतात. { अचानक वाहतूक पोलिस वाहने थांबवताच काही वाहने चौकादरम्यान आलेले असतात. ते मध्येच थांबतात. पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतरदेखील वाहनचालक ऐकत नाहीत. { सिग्नल अद्यापही सुरू असल्याने बाहेरगावच्या वाहनचालकांना हा नियमच माहिती नाही. त्यामुळे लाल सिग्नल लागताच ते थांबतात. त्यामुळे बराच गोंधळ उडत असल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...