आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:मनपाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर आता थेट गुन्हे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाकडून होणारी कामे नागरिकांच्या सोयीसाठी असतात. त्यामुळे या कामात अडथळा आणणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. गरज पडल्यास फौजदारीदेखील करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

क्रांती चौकाजवळील रमानगर येथे कचरा ट्रान्सप्लांट केंद्र सुरू आहे. या ठिकाणी विविध भागातील कचरा आणला जातो आणि तेथून तो मोठ्या वाहनांद्वारे प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. मात्र, या ठिकाणी कचरा डेपो होतो आहे, असे सांगत विविध पक्ष-संघटनांनी आंदोलन केले. त्यावर चौधरी यांनी येथे कचरा साठवणार नसल्याचे स्पष्ट केले. तरीदेखील आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात आंदोलकांनी केंद्राला टाळे ठोकले होते.

बातम्या आणखी आहेत...