आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:विद्यार्थी शाळाबाह्य होवू नयेत यासाठी आता 'एक गाव एक बालरक्षक’ मोहिम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार सहा ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांस नियमित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी ‘शाळाबाह्य’ होण्याची शक्यता वाढली आहे. विद्यार्थ्यांचे पालकांसोबतचे स्थलांतर रोखण्यासाठी राज्यात ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

दरवर्षी ऊसतोड, वीटभट्टीच्या कामासाठी अनेक पालक परजिल्ह्यात स्थलांतर करतात. आपल्या पाल्याची गैरसोय होवू नये, म्हणून पालक त्यांना देखील सोबत घेवून जातात. त्यामुळे या मुलांचे शिक्षण थांबते. परीणामी, पालकांसोबत गेलेली हे विद्यार्थी कालांतराने ‘शाळाबाह्य’ होतात. मजुरी करणाऱ्या पालकांसोबत जाणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी हंगामी वस्तीगृह स्थापन केली जातात. तसेच प्रत्येक गाव पातळीवर तसेच तालुक्यात ‘बालरक्षक’ मोहिम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत स्थलांतर होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह राहाण्याची, जेवणाची सर्व सुविधा केली जाते. मागील वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बालरक्षक मोहिमेला मोठे यश आले होते. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील पैठण व कन्नडला प्रत्येकी सहा तसेच सोयगाव, फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यात प्रत्येकी एक असे १५ हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात आले होते. यात सुमारे ३ हजार ३८० विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात शिक्षण विभागाला यश आले होते. यंदा कोरोनामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परीणामी, राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात देखील बाधा निर्माण झाली आहे. कोरोनामुळे रोजगाराची समस्या वाढल्याने गावातील मजुरी करणाऱ्यांचे स्थलांतर देखील वाढले आहे. या पालकांसोबत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. कोरोना परिस्थितीत मुले शाळाबाह्य राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष प्रयत्न केले जाणार आहे.