आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Now Our Initiative To Reduce The Stress On The Minds Of Corona Warriors, 'Prayas' Of 'Divya Marathi' In Collaboration With Psychiatrists And Psychiatrists

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रयास:कोरोना योद्ध्यांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी आता आमचा पुढाकार, मानसोपचार व मनोविकारतज्ज्ञंाच्या सहकार्याने ‘दिव्य मराठी’चा ‘प्रयास’

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संकल्प, करणार मोफत समुपदेशन

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. आरोग्य यंत्रणा, प्रशासन व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही यामुळे वाढता ताण आहे. २४ तास सेवा देत असल्याने त्यांच्या शरीरासोबतच मनावर याचा परिणाम होत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता ‘दिव्य मराठी’ व राज्यातील मानसोपचार आणि मनोविकारतज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत एक नवा संकल्प केला आहे. याचाच एक भाग म्हणून एक मेपासून राज्यातील ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ना मोफत समुपदेशन सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘प्रयास’ अभियान सुरू करण्यात येत असल्याची माहिती औरंगाबाद येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी दिली आहे.

या अभियानाअंतर्गत राज्यातील ‘फ्रंटलाइन वर्कर्स’चे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. अभियानाअंतर्गत डॉक्टरांचा सल्ला घेणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवली जातील.

कोरोनाला मनातून हरवायचंय
फ्रंटलाइन वर्कर्सवरचा ताण कमी करण्यासाठीच ही मोफत हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. - डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ
‘प्रयास’च्या माध्यमातून फ्रंटलाइन वर्कर्सचे मनोबल वाढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. - डॉ. रचना पोळ, मनोविकारतज्ज्ञ

अभियान केवळ ‘फ्रंटलाइन वर्कर्स’साठी
कोरोनाकाळात अनेक ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ सेवा बजावत आहेत. त्यांच्यासाठीच हे अभियान सुरू करण्यात आले असून, केवळ त्यांनीच डॉक्टरांशी संपर्क करून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन या अभियानातील डॉक्टरांनी केले आहे. यात डॉक्टर, नर्स, सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, राज्य सरकार ,केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदी डॉक्टरांची सेवा घेऊ शकतात.
मानसोपचारतज्ज्ञ : तज्ज्ञांशी आपण सकाळी ११ ते ७ या वेळेत फोनवर संपर्क करू शकता. सोमवार ते शुक्रवार हे समुपदेशन केले जाईल.
अशी असेल १० डॉक्टरांची टीम

बातम्या आणखी आहेत...