आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय:आता प्री प्रायमरी, केजी, नर्सरी देखील शिक्षण विभागाच्या नियंत्रणात; सुरू करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळांच्या मनमानी कारभाराला लगाम - Divya Marathi
शाळांच्या मनमानी कारभाराला लगाम

आजवर गल्ली बोळीत भरणाऱ्या प्ले स्कुल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा सररासपणे सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. परंतु आता या शाळा अशाच मनमानी पद्धतीने चालवता येणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता या शाळा सुरु करतांना शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असणार असून, शिक्षण विभागाचे नियंत्रण या शाळांवर असणार आहे.

निपुण वर्ग, शाळा, क्षमता या अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणा विषयी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावी पण राबविण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तर जिल्हा परिषदेच एकूण 2200 हून अधिक शाळा आहेत तर खासगी शाळांची संख्या देखील मराठी, उर्दू आणि इंग्रजी मिळून हजारच्या आसपास आहेत. यासह गल्ली बोळ्यांमध्ये प्ले गृप, नर्सरी, बालवर्ग, केजी आदी वर्ग अंगणवाड्या असतांनाही सुरु आहेत. आता तर अंगणवाड्या देखील प्राथमिक शाळांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्ले गृप, केजी, सिनिअर केजी या शाळांच्या नावाखाली अवाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे, शुल्क निर्धारित न ठेवणे या सर्व बाबींवर अंकुश बसणार असून, या शाळांना शिक्षण विभागाची परवानी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

त्या शाळांना परवानी घेणे आवश्यक

प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण म्हणाल्या की, आजवर मोठ्या प्रमाणात खासगी पद्धतीने नर्सरी, केजी, प्ले गृप असे वर्ग घेवून शाळा चालविण्यात आल्या आहेत. यावर आता शिक्षण विभागाचे लक्ष राहणार असून, त्यांना परवानगी घेणे बंधनकारक असले. शिवाय अंगणवाडी देखील शाळांना जोडली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांना वयानुसार, मानसिक विकासासानुसार शिक्षण देणे अनिवार्य असणार आहे. यात शाळांची नियमित तपासणी केली जाणार आहे.या बरोबरच शाळांमध्ये विद्यार्थी मूल्यमापन देखील केले जाणार आहे.