आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात काम पूर्ण होणार:आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून विद्यार्थी मिळवतील पदवीची प्रत

औरंगाबाद / डॉ. शेखर मगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून १० वर्षांत यूजी, पीजी केलेल्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून डाऊनलोड करता येणार आहे. यूजीसीने ‘नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी’(एनएडी) संकेतस्थळ निर्माण केले आहे. ‘एनएडी’वर १२ लाख पदवी प्रमाणपत्र अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २.३८ लाख पदवी अपलोड झाल्या आहेत. उर्वरित ९.६२ लाख पदव्यांचे काम एका महिन्यात होणार आहे.

भारताच्या कुठल्याही विद्यापीठातून पदवी प्रमाणपत्र घेणाऱ्यांकडे नोकरी देणारा (नियोक्ता) कायम साशंकतेने पाहतो. पदवी, पदव्युत्तर पदवी अर्हता प्राप्त करणारा युवक एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडर संस्था, कॉर्पोरेट कंपनी किंवा सरकारी विभागातील नोकरीसाठी जेव्हा अर्ज करतो. त्यावेळी उमेदवारांना न सांगता नोकरी देणारे संबंधित विद्यापीठांकडे खातरजमा करण्यासाठी लेखी पत्र पाठवतात. विद्यापीठाला असे हार्ड कॉपीचे पत्र प्राप्त झाल्यावर ‘व्हेरिफाइड अँड धिस डिग्री इज फ्रॉम अवर युनिव्हर्सिटी’ असा शेरा मारून पुन्हा नियोक्त्यांकडे पाठवले जाते. या सर्व प्रक्रियेत खूप वेळ जातो.

म्हणून देशातील सर्व विद्यापीठांच्या पदवी प्रमाणपत्र एकाच संकेतस्थळावर आणण्याचे काम यूजीसीने हाती घेतले आहे. त्यासाठी ‘नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड’ला (एनएसडीएल) यूजीसीने काम सोपवले आहे. एनएसडीएलतर्फे ‘एनएडी’ अधिकृत संकेतस्थळ निर्माण केले जात आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आत्तापर्यंत २.३८ लाख पदवी प्रमाणपत्र अपलोड केले आहेत. शैक्षणिक सत्र २०१२-१३ ते २०२२-२३ पर्यंत उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत. ते एकूण १२ लाखांच्या घरात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले आहे. आम्ही हे काम एमकेसीएलला दिले आहे. ३० दिवसांत हे काम पूर्ण केले जाऊ शकते असे डॉ. मंझा यांनी म्हटले.

गुणपत्रिकाही अपलोड कराव्या लागतील फक्त पदवी नव्हे तर विद्यार्थ्याचे सर्व गुणपत्रिकांचाही ‘डेटा’ एनएडीवर अपलोड करावा लागेल. १२ लाख पदव्यांच्या ९६ लाख गुणपत्रिका आहेत. पण यूजीसीने गुणपत्रिका अपलोड करण्यासाठी दिलेला फॉर्मेट विद्यापीठाच्या गुणपत्रिकेशी मॅच होत नाही. कारण, यूूजीसीने एकाच रांगेत विद्यार्थ्याची ७२ निकषांची माहिती भरण्याचे फॉर्मेट दिले आहे. त्यासाठी एमकेसीएल अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करत आहे. देशातील तमाम विद्यापीठांचे ‘डेटा’ एनएडीमध्ये अपलोडचे काम सुरू आहे. त्यात या विद्यापीठाचाही समावेश आहे.

विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी दिला जाईल मागील १२ वर्षांतील डिग्री अपलोड करण्याचे महिनाभरात पूर्ण होईल. गुणपत्रिकेचेही काम मार्चपर्यंत होईल. पुढील वर्षीपासून प्रत्येक पदवी प्रमाणपत्राचे ‘डेटा’ एनएडीवर अपलोड करण्याचे काम सुरू राहिल. विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी दिला जाईल. एम्प्लॉयरही आता आमच्याकडे पत्र पाठवण्याऐवजी मुलाखतीच्या वेळीच पदवी प्रमाणपत्रांच्या शंकांचे निरसन करू शकतील.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...