आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फक्त लॅपटॉप घेऊन या अन‌् लागा कामाला... आता कामासाठी ऑफिसच्या जागेची तक्रार संपली, औरंगाबादेत वर्क स्टेशन तयार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • बीड बायपासवर को-वर्किंगची सोय, ऑफिसच्या किरायापेक्षा सहापट कमी खर्च

स्टार्टअप, डिजिटल व्यावसायिक, सतत फिरस्तीवर असणारे तसेच बाहेरच्या शहरात मुख्यालय असणाऱ्यांना शहरात पूर्णवेळ ऑफिसची गरज भासत नाही. थोड्या कामासाठी पूर्णवेळ कार्यालय सुरू करणे परवडत नाही. “वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना घरात कामाची अडचण येते. अशा कर्मचाऱ्यांच्या ऑफिसची तक्रार आता “वाबी साबी’च्या “को वर्किंग’ संकल्पनेमुळे सुटली आहे. लॅपटॉप घेऊन या आणि कार्यालयाप्रमाणे काम करण्याची सुविधा बीड बायपासवर “वाबी साबी’मध्ये उपलब्ध झाली आहे. “वाबी साबी’च्या संचालिका हर्षाली मारू यांचा एक स्टार्टअप आहे. त्यांना घरात या कामासाठी वातावरण मिळत नव्हते.

कायमस्वरूपी ऑफिस नसणाऱ्यांना, “वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांनाही अशीच अडचण येत असेल. अशा विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी कामाची जागा उपलब्ध करून दिली तर? हा विचार आला आणि यातून देवळाई चौकाजवळ को-वर्किंग संकल्पनेचा जन्म झाल्याचे हर्षाली सांगतात. हर्षाली एमबीए-मार्केटिंग असून त्यांनी फ्लिपकार्ट, ओयो आणि एसी निल्सनमध्ये काम केले आहे. जयन वेल्लोर व्हीआयटीतील पदवीधर आहेत. “वाबी साबी’ हा जापानी शब्द असून याचा अर्थ प्रतिकूल परिस्थितीतही संधी शोधणे असा आहे.

या सुविधा मिळणार एसी हॉल, १५ जणांसाठी वर्कस्टेशन, ३ स्वतंत्र केबिन, १० जणांना टर्फवर बसून कामाची सोय, प्रत्येक वर्क स्टेशनवर लॅन कनेक्शन, लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंग, वायफाय, व्हाइट बोर्ड, ड्रॉवर, प्रिंटर, इन्व्हर्टर आणि १५ जणांसाठी प्रोजेक्टरसहित कॉन्फरन्स रूम. सोबतीला कार्यालयीन कामासाठी आवश्यक साहित्याची वेलकम किट, पूल टेबल आणि शाकाहारी रेस्टारंट.

आपल्यासाठी लाभदायी संकल्पना
कन्सलटंट, फ्री लान्सर, बाहेरच्या शहरात मुख्यालय असणारे, सतत प्रवास करणारे, स्टार्टअप्स, छोटे व्यावसायिक व ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांना क्वचितच ऑफिसची गरज भासते. आयटी, बीपीओत रात्रीची शिफ्ट करणाऱ्यांमुळे घरात अडचण होते. अशा सर्वांनाच “को-वर्किंग’चा फायदा होणार आहे. परदेशातील ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे, असे सहसंचालक जयन मारू म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...