आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी घेण्यासाठी फायली मुंबई, पुणे, नागपूरला पाठवल्या जातात. तेथील वरिष्ठ अधिकारी प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करतात. यात दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या साधारणत: ५०० फायली ५०० ते ७०० किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामध्ये महिनोन् महिने लागतात. मार्चमध्ये धावपळ करून फायलींवर मंजुरी घेतली जाते. हा प्रकार थांबवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकार घेत आहे.
त्यासाठी डीपीसीचे धोरण बदलण्याचीही तयारी होत आहे. त्यानुसार महावितरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, महसूल, सिंचन आदींचे जिल्हास्तरीय अधिकारीच फाइल मंजूर करतील. अंतिम जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल. नव्या धोरणामुळे अधिकारांचे विकेंद्रीकरण होईल. कामांना मंजुरीचा वेळ वाचेल, असे मानणारा अधिकाऱ्यांचा मोठा वर्ग आहे. त्याचवेळी स्थानिक नेते या धोरणाचा गैरफायदा घेतील. अधिकाऱ्यांवर दबाब टाकून त्यांना हव्या त्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळवतील, असा सूर व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात आमदार आशिष जैस्वाल यांनी डीपीसीची कार्यपद्धती, एकूण अधिकार आणि काळाची गरज लक्षात घेता विस्तार या विषयावर लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण बदलणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, प्रस्तावांना जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनीच मंजुरी देणे अपेक्षित आहे. कारण आॅनलाइन पद्धत उपलब्ध असूनही अनेकदा फायली मंत्रालयात मागवल्या जातात. यात बराच वेळ जातो. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांवर काही जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. १६ वर्षांपूर्वीही असाच निर्णय: माजी मंत्री जयंत पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले की, २००६-०७ मध्येही आम्ही असाच निर्णय घेतला होता. त्याची दोन वर्षे अंमलबजावणीही झाली, पण नंतर पुन्हा फायली मुंबईला पाठवण्याचे सत्र सुरू झाले. आणि त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. आता पुन्हा तोच निर्णय होणार असेल तर त्यातील त्रुटी दूर करणारे धोरण हवे. गुणवत्तेवर परिणामाची भीती: नव्या धोरणाविषयी काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेकदा पालकमंत्री तसेच आमदार अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. तेव्हा आम्ही मंुबईकडे बोट दाखवतो. आता स्थानिक पातळीवर मंजुरीचे धोरण ठरले तर राजकीय मंडळी प्रचंड दबाव टाकतील. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
प्रशासकीय कामकाज करतांना अधिकारांचे विकेंद्रीकरण फायद्याचे असते. कामांना स्थानिक पातळीवर मंजुरी मिळणे चांगले आहे. त्याची सरकारी कार्यालयात योग्य पद्धतीने, काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. कृष्णा भोगे, माजी विभागीय आयुक्त
कामांचे नियोजन करणे सोपे होईल
अनेकदा एखाद्या त्रुटीसाठी फाइल मंत्रालयात फिरत राहते. आमदार त्याचा पाठपुरावा करू शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे मुख्य अभियंता, विभागीय उपसंचालकांसारखे तज्ज्ञ अधिकारी असताना फाइल मंत्रालयात पाठवण्याची गरज नाही. नव्या धोरणामुळे कामांचे नियोजन करणे सोपे होईल. मार्च एंडच्या तोंडावर निधी खर्चण्याचा प्रकारही बंद होईल. -प्रशांत बंब, आमदार
विकेंद्रीकरणाने फायदा, मात्र अंमलबजावणी व्हावी
सध्या काय पद्धत वैद्यकीय शिक्षण, महावितरण, पशुसंवर्धनसह विविध विभागांच्या फायली तांत्रिक मान्यतेसाठी आधी मुंबईला पाठवल्या जातात. काही विभागांचे मुख्यालय नागपूर, पुण्यात असल्याने तिथेही फाइल पाठवली जाते. अनेकदा या फायली द्वितीय, तृतीय श्रेणीतील कर्मचारी घेऊन जातात. ते चारचाकी, रेल्वेने प्रवास करतात. त्यात किमान तीन दिवस जातात. मंत्रालयात सचिव व्यस्त असतील तर महिनाभर फाइल पडून राहते.
प्रशासकीय कामकाज करतांना अधिकारांचे विकेंद्रीकरण फायद्याचे असते. कामांना स्थानिक पातळीवर मंजुरी मिळणे चांगले आहे. त्याची सरकारी कार्यालयात योग्य पद्धतीने, काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. कृष्णा भोगे, माजी विभागीय आयुक्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.