आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफंडा असा की, तुम्ही भव्य लग्नाचा विचार करत असाल तर आपल्या आणि पाहुण्यांच्या महागड्या वस्तूंच्या सुरक्षेसाठी एखाद्या सिक्युरिटी सर्व्हिसची सेवा घेणे विसरू नका.
एप्रिलच्या मध्यापासून ते जुलैच्या सुरुवातीपर्यंत देशात कमीत कमी ४० लाख लग्ने लागतील. त्यात जवळपास पाच लाख कोटी रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा आहे. हा आगामी लग्नांचा हंगाम ४३ दिवस चालेल. लग्नात ५० लाख रुपयांपासून एक कोटीपर्यंत खर्च करणारे त्यांच्या बजेटच्या ८० टक्के विविध सुविधा देणाऱ्या एजन्सींवर खर्च करतात. प्रवेशद्वारावर विविध सेवा देण्यासाठी उभे राहणे नवा ट्रेंड मानण्याचे दिवस गेले आहेत. आता ज्या नव्या सर्व्हिसची गोष्ट होत आहे, ती मजबूत सिक्युरिटी सर्व्हिस! धक्का बसला? पुढे वाचा.
मुंबई पोलिसांनी मुलांच्या अशा टोळीचा पर्दाफाश केला, त्यांचे प्रमुख त्यांना चोरी करायला सांगत होते. ही टोळी मुलांना मध्य प्रदेशातील गावांमध्ये प्रशिक्षित करते नंतर बिहार, दिल्ली, हरियाणा, यूपी, पंजाब, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील मोठ्या लग्नांवर लक्ष ठेवून त्यांच्यात मुलांचा वापर करत असल्याची मुंबई पोलिसांना खात्री आहे. गेल्या एक महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्या कारवाया आणि त्यांच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले.
सिसोदिया टोळीत सदस्य मुले आहेत, ती भोपाळपासून १२० किमी लांब कडिया सांसी आणि इंदूरहून १८० किमी लांब गुलखेडी गावातील आहेत. ही मुले प्रशिक्षित आहेत. वर, वधूंचे नातेवाईक समारंभात कार्यरत असताना ते गुपचूप त्यांचे सामान घेऊन कारमध्ये प्रतीक्षा करणाऱ्या साथीदारांना सोपवतात. टोळी प्रमुख १२-१३ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले सोबत ठेवतात, म्हणजे पोलिसांनी पकडले तरी सोडता येईल. या मुलांना भोळ्या लोकांना फसवण्याचे शिकवले जाते, तसेच खोटे रडून पोलिस चौकशी सहन करण्याचे शिकवले जाते.अशाच एका प्रकरणात पोलिसांनी मुंबईच्या उपनगरात अनेक लग्नांतील चोऱ्यांमध्ये सामील आठ वर्षांच्या मुलाला पकडले आणि काही प्रमुखांना अटक केली. सिसोदिया टोळी मुख्यत्वे सात आसनी गाडीत येते आणि संशय येऊ नये म्हणून लग्नात घालायचे कपडे घालते. ते समारंभस्थळी पाकिटे आणि मोठ्या गिफ्टसोबत प्रवेश करतात म्हणजे कुणाला संशय येत नाही. संपूर्ण कडिया सांसी गाव या गुन्ह्यात सामील असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २६ लाख रुपयांचे सोने आणि रोकड हस्तगत केली आणि मुंबईत कमीत कमी सात प्रकरणांत त्यांचा समावेश असल्याचे दिसले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टोळी प्रमुख प्रशिक्षण केंद्र चालवतो, तेथे तो मुलांच्या आईवडिलांकडून प्रत्येक कसब शिकवण्याचे पैसे घेतो. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा चोरी करण्याचा अभ्यासक्रम आहे. मुलांना सर्व कसब शिकायचे असेल तर आईवडिलांना पाच लाख रुपये द्यावे लागतात. गुन्हे शाखेने सांगितले, त्यांच्या गुन्ह्याच्या पद्धतीत ते लग्नात जायच्या आधी टोळीतील सर्व सदस्यांचे सिमकार्ड काढून ठेवतात म्हणजे त्यांचे फोन नंबर डंप डाटात दिसू नयेत, ज्याचा वापर पोलिस गुन्हेगांराचा शोध घेण्यासाठी करतात. नंतर बिन बुलाये पाहुणे प्रशिक्षित मुलांसोबत जात पाहुण्यांमध्ये मिसळतात. ही लहान मुले आपसात खेळण्याचा बहाणा करत जेथे महागडे सामान ठेवले असते.
मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.