आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आता वृद्धाश्रमांतही अ‌ॅडमिशनसाठी वेटिंग लिस्ट; अनेक ठिकाणी सरासरी 13 ते 15 जण प्रतीक्षा यादीत

औरंगाबाद / रोशनी शिंपी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असून अनेक वृद्धाश्रमांमध्ये सरासरी १३ ते १५ जणांची वेटिंग लिस्ट असल्याचे "दिव्य मराठी'च्या पडताळणीत पुढे आले आहे. विशेष म्हणजे, शहरी नोकरदार घरांमध्ये जागेच्या वा वेळेच्या अभावी वृद्धांसाठी "डे केअर'चीही मागणी वाढत आहे. औरंगाबादेत गेल्या २३ वर्षांपासून मातोश्री वृद्धाश्रम कार्यरत आहे. शासकीय अनुदान होते तेव्हा येथे १०० वृद्धांची व्यवस्था होती. आता ट्रस्टने देणगीदारांच्या आधाराने दीडशेहून अधिक वृद्धांची सोय येथे केली आहे. तरीही १०-१५ जणांची नावे प्रतीक्षा यादीत असल्याचे येथील व्यवस्थापक सागर पागोरे यांनी सांगितले. येथील चांगल्या सोयींमुळे आठवड्याला येथे २० ते ३० कुटुंबांमधून विचारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

नाशिक : अनेक वृद्ध स्वत:हूनच आश्रमात राहायला जात आहेत पेन्शनर वा सधन कुटुंबातील वृद्ध स्वत:हून वृद्धाश्रमात येऊन राहत असल्याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती नाशिकच्या मातोश्री केंद्राचे व्यवस्थापक नामदेव थोरात यांनी दिली. नोकरीसाठी अनेेकांची मुले बाहेरगावी असल्याने घरी एकटे राहण्यापेक्षा किंवा वैद्यकीय मदत, सोबत व दैनंदिन गरजांची पूर्तता एकाच छताखाली होत असल्याने वृद्धांचा कल वृद्धाश्रमाकडे वाढत आहे. ३५% लोक घरात करमत नाही म्हणून येथे राहतात.

औरंगाबादेत डे केअर सुरू आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून येथे ३० ज्येष्ठांसाठी डे केअरही सुरू करण्यात आले आहे. १०० जणांसाठी विस्तारित व्यवस्था उभारण्यात येत आहे. पती-पत्नी दोघेही कामावर जाताना घरातील ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या विश्वासू व्यवस्थेची मागणी वाढत असल्याच्या ट्रेंडला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य यांनी दुजोरा दिला.

औरंगाबादेत साडेचार वर्षांपूर्वी स्नेहसावली केंद्र सुरू झाले तेव्हा तेथे फक्त ७ वृद्धांचे प्रवेश झाले होते. सध्या तेथे ४७ वृद्धांची सेवा करण्यात येते. मागणी वाढत असल्याचे स्नेहसावलीचे संचालक डॉ. बालाजी आसेगावकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...