आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दरवर्षी शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचा नियम आहे. परंतु यंदा शाळाच उशीरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दोन गणेवशाऐवजी एकच गणवेश देण्याचे प्रयोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आखले आहे. त्यासाठी १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व जिल्हा परिषद, शासकीय, निमशासकीय पहिली ते आठवीत शिकणाऱ्या एससी, एसटी, आर्थिक दुर्बल आणि सर्व मुलींना शालेय गणवेश देण्यात येतो. प्रति विद्यार्थी तीनेश रुपये प्रमाणे एका विद्यार्थ्यास दोन गणवेश प्रमाणे सहाशे रुपये देण्यात येतात. गणवेशाची ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात किंवा पालकांना दिली जात होती. परंतु त्याबाबत पालकांकडून गणवेशाचे पैसे गणवेशासाठी वापरले जात नसल्याच्याही तक्रारी आल्याने आता पुन्हा शाळेला विद्यार्थी संख्येनुसार ही रक्कम देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे माप घेवून गावातच सर्व गणवेश शिवून विद्यार्थ्यांना देण्यात येतो. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांना परीक्षा न घेताच सुट्या देण्यात आल्या. तर २०२१-२२ हे शैक्षणिक सत्र उशीरा सुरु झाले आहे. पाचवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरु करण्यात आले आहे. तर अद्याप पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरु होताना जून महिन्यात देण्यात येणारा शालेय गणवेशाचे वाटपच झालेले नाही. आता पाचवी ते आठवीच्याच विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपयांची तरतुद करण्यात आली आहे असे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले. शाळा सुरु झाल्याने यंदा दोन नाही परंतु एका गणवेशाचे नियोजन केल्याचेही ते म्हणाले.
अशी आहे विद्यार्थी संख्या -
४२ हजार १६१ विद्यार्थीनी आणि ६ हजार २४१ विद्यार्थी आहेत.
मार्च महिन्यात पहिली ते चौथीचे वर्ग :
दरम्यान पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता असून, मार्च महिन्यात या वर्गांना सुरु करण्याच्या विचारात शासन आहे. अशी चर्चा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील केल्याचेही जयस्वाल म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.