आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डीला नाइट लँडिंग सुरू झाले. शिर्डीला विमानसेवेसाठी सहजपणे विमाने उपलब्ध होत अाहेत, तर दुसरीकडे मुंबईसाठीचे चिकलठाणा विमानतळावरून सुरू असलेले सायंकाळचे विमान प्रवासी संख्या पुरेशी असताना बंद करण्यात आले. आता छोटे विमानही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मुंबईसाठी सायंकाळचे विमान सुरू करण्यासाठी मेअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जिल्ह्याचे खासदार अथवा दोन केंद्रीय मंत्र्यांपैकी कोणीही दखल घेतलेली नाही. चिकलठाणा विमानतळावरून हैदराबादसाठी दोन ७८ आसनी विमाने सुरू आहेत. मुंबईसाठी सकाळचे २२२ क्षमतेचे विमान सुरू असून सायंकाळचे विमान १८६ आसन क्षमतेचे होते. इंडिगोने हे विमान चेन्नई-सिंगापूरसाठी वापरले आहे. मुंबईसाठी सायंकाळच्या विमानाला चांगली प्रवासी संख्या होती.
विमान फायद्यात सुरू असताना बंद करण्यात आले. एअर इंडियाचे मुंबई आणि दिल्लीसाठी प्रत्येकी एक विमान आहे. एअर इंडियाकडे विमानांचा तुटवडा आहे. मेअखेरपर्यंत मुंबईचे विमान सुरू करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे नागरी उड्डयन समितीचे चेअरमन सुनीत कोठारी यांनी सांगितले. इंडिगोने चिकलठाणा विमानतळावरून बंगळुरूला २८ मार्चपासून आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू केली आहे. मुंबईसाठी सायंकाळी सेवा सुरू करण्यासाठी इंडिगो, एअर इंडिया, स्पाइस जेट, अलायन्स आदी कंपन्यांकडे विनंती केली जात असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.