आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाची भावना:आता गोरगरीब मराठा समाजासाठी घटनेत टिकणारे आरक्षण मिळावे

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरगरीब मराठा समाजासाठी घटनेत टिकणारे आरक्षण आता मिळावे, अशी भावना मराठा क्रांती मोर्चातर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. शुक्रवारी त्यांनी मराठा मोर्चा समन्वयक विनोद पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेव्हा ही भावना, अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री लढवय्ये असून उपमुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी मी पूर्ण ताकदीनेप्रयत्न करणार, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे यांचीही या वेळी उपस्थिती होती.

या भेटीत झालेली चर्चा, मुद्दे असे. राजेंद्र दाते पाटील : मराठा समाजाची स्थिती व आरक्षणाची गरजेवर माहिती दिली. आम्ही दिलेल्या पुराव्यांचा स्वीकार करून सरकारने न्यायालयात बाजू मांडावे. रेखा वाहटुळे, सुवर्ण मोहिते, सुकन्या भोसले, मनीषा मराठे : मराठा समाजाला घटनेत टिकणारे आरक्षण द्यावे. कोपर्डीतील आरोपी सरकारचे जावई आहेत का? सुनील कोटकर : दिल्लीच्या धर्तीवर आरोग्य सेवा मिळाव्यात. या वेळी अभिजित देशमुख, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांचीही उपस्थिती होती.