आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी शिक्षणासाठी वेगळ्या प्रवेशाची गरज पडणार नाही:आता भारतात प्रवेश घेऊन परदेशी विद्यापीठातही शिकण्याची संधी मिळेल

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे शीर्षस्थानी असलेले विद्यापीठ विदेशी शिक्षण संस्थेसोबत मिळून अनेक कोर्सेस ऑफर सुरू करतील, अशी घोषणा यूजीसीने केली आहे. विद्यार्थी देशातील संस्थेत प्रवेश घेऊन विदेशातूनही शिक्षण मिळवू शकतील. यूजीसीच्या मते, ट्विनिंग प्रोग्राम्स, जॉइंट डिग्री प्रोग्राम्स आणि ड्यूअल डिग्री प्रोग्राम्समध्ये भारतीय संस्थांबरोबरच परदेशी विद्यापीठांमध्येही शिक्षण घेण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल.

ड्यूअल डिग्री प्रोग्राम
यासाठी ५० परदेशी संस्थांनी स्वारस्य दाखवले. यामध्ये विद्यार्थ्यांना एकाच क्षेत्रात दोन पदव्या घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच, विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या ३० टक्के परदेशात अभ्यास करू शकतील.

जॉइंट डिग्री प्रोग्राम
भारतीय आणि परदेशी विद्यापीठे एकत्रितपणे विविध अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रम तयार करतील. भारतीय आणि भागीदार संस्था यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना ही पदवी संयुक्तपणे दिली जाईल. पदवीवर दोन्ही संस्थांचा लोगो असेल.

ट्विनिंग प्रोग्राम
यात विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेईल त्यातील ३० टक्के अभ्यासक्रम संबंधित परदेशी विद्यापीठाकडून ऑफलाइन पद्धतीने शिकवला जाईल. मात्र पदवी भारतीय संस्थाच देईल.

बातम्या आणखी आहेत...