आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्याकिय शिक्षण अभ्यासक्रमासाठी येत्या शनिवारी (दि.११) सप्टेंबर नीट पीजी; तर रविवारी (दि.१२) सप्टेंबर रोजी नीट युजीची परीक्षा घेण्यात येणार आहे. 6 सप्टेंबरला याबाबत प्रवेशपत्र संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा ड्रेसकोड कसा असावा, परीक्षेला येताना सोबत काय आणावे, काय आणू नये याबाबत नियमावली जाहीर केली आहे.
नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना दागदागिणे, ज्वेलरी घालून येवू नये. मोबाईल अथवा मेटलची कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. दिलेल्या वेळेच्या किमान अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाणे अनिवार्य आहे. परीक्षेला येताना तोंडाला मास्क, हॅण्डग्लोव्हज् घालून येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी फूल शर्ट आणि मुलींनी अंगभर डिझायनर कपडे, मोठे बटण असलेले कपडे घालून परीक्षेला येवू नये. तसेच मोठ्या हील्सचे सॅंडल, शूज तसेच मोठे खिसे असणाऱ्या पॅन्ट घालून येवू नये. परीक्षा केंद्रावर दागिणे, कानातले, बोटातील अंगठी, पेंडेंट्स, गळ्यातील हार, बांगड्या असे कोणतेही दागिणे घालून येण्यास बंदी असल्याचे नियमावलीत सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना हाफ शर्ट, टी-शर्ट घालून येण्यास परवानगी दिली. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी शूज, चप्पल किंवा सॅण्डल्स वर्गाच्या बाहेर काढून ठेवावे लागणार आहे. सोबत सॅनिटायझर घेवून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.