आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रवाशांची वाढली संख्या:बसमध्ये उभे राहून करावा लागला प्रवास; महिला व लहान मुलांचे हाल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवस शासकीय सुट्या आणि ग्रामपंचायत निवडणूक मतदान असल्याने गावी जाण्यासाठी अचानक प्रवासी ची संख्या वाढली होती परिणामी प्रवाशांना बसमध्ये भरून प्रवास करावा लागला जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. महिला प्रवासी व लहान मुलांच्या यामध्ये प्रचंड हाल झाले.

शनिवार रविवार दोन दिवस सलग सुट्ट्या आले आहेत. तर 18 तारखेला ग्रामपंचायतच निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे विविध महानगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या शुक्रवारी सायंकाळपासून अचानक वाढली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पासून एकाच वेळी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने बसस्थानकावरती तुफान गर्दी झाली होती. त्या तुलनेत बसची संख्या अतिशय तुकडी होती. परिणामी 43 सीटांची क्षमता असलेल्या बसमध्ये उभे राहून प्रवाशांना प्रवास करावा लागला.

जागा पकडण्यासाठी धावपळ

बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. कुणी खिडकीतून रूमाल, बॅग, पिशवी टाकून आसन आरक्षीत करत होते. तर कुणी एसटीच्या दरवाजातून धक्काबुक्की करत वर चढून जागा पकडण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले. सिटवर ठेवलेले रूमल बाजूला ठेवून काहींनी जागा बळकावली. यामुळे वादही झाल्याचे दिसून आले.

औरंगाबाद वरून एकच गाडी

सिडको बस स्थानकातून जालना सिंदखेडराजा साखरखेर्डा मार्गावर एकच बस धावते. या बसमध्ये साखरखेर्ड्याला जाणा-या दोन महिला व दोन पुरूष प्रवाशांना गर्दीमुळे जाता आले नाही. बसमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.

नियोजन हुकले

बस मध्ये जागा नसल्यामुळे अनेक प्रवाशांना तीन-चार बसची वाट पाहावी लागली. तरी जागा मिळत नसल्याने उभे राहून प्रवास करावा लागला यामुळे गावी लवकर जाण्याचे व कामाचे नियोजन हुकले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...