आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत:परिचारिकांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी : डॉ.  जयश्री देशमुख

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पातळीवरील आरोग्याच्या गरजा नेहमीच सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय असतो. परिचारिकांनी स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवल्यास त्या इतरांचे आरोग्य चांगले ठेवू शकतात, असे मत शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री देशमुख यांनी व्यक्त केले.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच दंत महाविद्यालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. अनिल बुरले, रुग्णालय उपअधीक्षक डॉ. नरेश निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे त्या म्हणाल्या, सांसर्गिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी, दुर्गम भागात आरोग्यसुविधा पोहोचवण्यात, आरोग्य सेवा वितरणात, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य पुरवण्यास नर्सेस कायम तत्पर असतात. सतत ताणतणाव असल्याने त्यांचे मानसिक संतुलन, भावनांवर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती, विचारशक्तीची कुवत काम करण्यास अपुरी पडू शकते. म्हणून नर्सेसच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नर्सेसच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. याप्रसंगी सहायक अधिसेविका रेखा खानझोडे, लीला गायकवाड, गौतमी धावारे, वैशाली कंकाळ, सखू ढेपले, ऊर्मिला देशमुख, संगीता आपशिंगे, पूनम हातेडीकर, प्रिया निर्मल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

बातम्या आणखी आहेत...