आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:नूतन साहित्य मंदिराला वि.वा. देसाई पुरस्कार

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेली तीन ग्रंथालये १९६० मध्ये बंद पडल्यानंतर छोट्याशा खोलीतून तीनमजली इमारतीपर्यंत ग्रंथालय उभारले. यामुळे वाचकांची संख्या वाढली असल्याचे मत प्राचार्य जे.एम. मंत्री यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ सोशियो-इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशनतर्फे शनिवारी हिंगोलीच्या रं.रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाला वि.वा. देसाई पुरस्कार पुरस्कार देण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस.बी. वराडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

त्याप्रसंगी मंत्री बोलत होते. व्यासपीठावर स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद देशपांडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंत्री म्हणाले, वाचनालयात दररोज ८५० वाचक येतात. स्वत:चे सॉफ्टवेअर तयार केले आहे. पैठणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...