आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मापात पाप

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे. याच धर्तीवर सरकारने मध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्य वाटप करण्यात येत आहे.

वितरणासाठी शाळांना देण्यात येत असलेल्या ५० किलोची तांदळाची गोणी वजन फक्त ४५ ते ४६ किलो भरत आहे. परिणामी, मुलांना नियमानुसार तांदूळ देण्यासाठी कमी पडत असल्याच्या तक्रारी मुख्याध्यापकांकडून शालेय पोषण आहार अधीक्षकांना प्राप्त होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे शक्य नसल्याने कोरडा शिधा दिला जात आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता ३.४ किलो आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याकरिता ५.१ किलो या प्रमाणात तांदूळ देण्यात येत आहे. पुरवठादारांकडून शाळांना पन्नास किलो तांदळाच्या गोण्या वितरीत करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या तांदळाच्या गोण्यांमध्ये फक्त ४५ ते ४६ किलो तांदूळच भरत आहे. पुरवठादाराकडे वजनकाटा असताना तांदूळ मोजून देण्यात येत नाही. त्यानंतर शाळांच्या मुख्याध्यापकांनाच दोषी धरण्यात येते. पुरवठादार मात्र बाजूलाच राहातो, अशी खंतही काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. ४५ ते ४६ किलो तांदूळ भरत असल्याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांचे फोन आले होते. मात्र, मुख्याध्यापकांनी वितरकांवर विश्‍वास ठेवू नये. तसेच वजन केल्याशिवाय शालेय पोषण आहाराचे तांदूळ घेवू नयेत. याबाबत वितरकांना विचारणा करण्यात येईल. - भाऊसाहेब देशपांडे (अधीक्षक, शालेय पोषण आहार)

बातम्या आणखी आहेत...