आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादररोजच्या कामात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यातून विविध आजार समोर येतात. पोषक आहार, नियमित झोप घेत आरोग्य चांगले ठेवू शकतात, असे अनेक सल्ले डॉ. जानकीदेवी बोराडे यांनी व्यक्त केले.प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे स्त्री जीवनातील वेगवेगळे टप्पे व त्या टप्प्यावर घ्यावयाची काळजी या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. बोराडे बोलत होत्या. त्यांनी आरोग्याविषयी चार टप्पे सांगितले. त्यात पहिला टप्पा जन्मापासून पाळी येईपर्यंतचा. या टप्प्यात अन्नपदार्थाच्या व गोळ्यांच्या रूपात कॅल्शियम दिले पाहिजे. एक ते दीड तास मैदानी खेळ खेळा. खेळल्याने कॅल्शियमचे शोषण चांगले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाळीनंतर पीसीओडीचे प्रमाण वाढते. यामध्ये अनियमित पाळी दिसून येते.
यासाठी नियमित व्यायाम करणे, योगासने, ध्यान करणे, घरी शिजवलेले ताजे अन्न खाणे, जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. आज वंध्यत्वाचे प्रमाण खूप वाढले असून त्यासाठी खूप जोडप्यांना आयव्हीएफची मदत घ्यावी लागते. यामध्ये स्त्रीबीज आणि पुरुषाचे बीज त्यांच्यामधून काढून शरीराबाहेर पण शरीरासारखे वातावरण निर्माण करून गर्भ तयार केला जातो. तो गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात परत सोडला जातो. तिसऱ्या टप्प्यात मध्यमवयीन स्त्रीला स्वतःची काळजी घेण्याची खूप गरज आहे. स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग टाळू शकतो. चौथ्या टप्प्यात मेनोपॉजची लक्षणे दिसून येतात. अचानक गरम झळा येणे, खूप घाम येणे, चिडचिड होणे, झोप न येणे, थकवा येणे, केस गळणे, त्वचा कोरडी होणे, लघवीच्या जागेवर खाज येणे, लक्षणे दिसल्यास वेळेत उपचार घ्या, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.