आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील व्यापाऱ्यांचे आमदार, मंत्र्यांंना निवेदन:आस्थापना कराविरोधात आक्षेप नाेंदवा : पालिका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा हद्दीतील व्यापाऱ्यांकडून खासगी एजन्सीकडून आस्थापना परवाना शुल्क वसूल करण्यात येत असल्याचा आराेप व्यापाऱ्यांनी केला आहे. इतर जिल्ह्यांत आस्थापना शुल्क नाही. त्यामुळे मनपाने या कराला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत त्यांनी आमदारांपासून ते मंत्र्यापर्यंत निवेदन दिले. स्थगितीसाठी तुम्ही आक्षेप नाेंदवा, अशी भूमिका मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी घेतली आहे. आस्थापनाचा कर कायदेशीररित्या लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू करताना शॉप ॲक्ट लायसन्स बंधनकारक आहे. त्यांना व्यावसायिक दराने जागेसाठी कर लावला जाताे. मग परत वेगळा आस्थापना परवाना शुल्क कर कशासाठी, असा सवाल व्यापाऱ्यांनी केला. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सने यासंदर्भात मनपा प्रशासन, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदिपान भुमरे आदींसाेबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून विरोध केला. मंत्री केवळ आश्वासन देतात, प्रश्न सुटत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सुरुवातीपासूनच विरोध शहरात ३० हजार व्यापारी आहेत. सुरुवातीपासूनच आम्ही आस्थापना कराला विरोध करत आहाेत. याबाबत मनपा प्रशासनासह मंत्र्यांनाही निवेदन दिले. आता मनपा प्रशासकांकडे पुन्हा आक्षेप नोंदवू. - संजय कांकरिया, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ

बातम्या आणखी आहेत...