आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:शांतीनिकेतन काॅलनीतील घर कोविड सेंटर करण्यास शेजाऱ्यांच्या विराेधामुळे ‘बाधा’!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरिश्चंद्र मित्तल यांची १६ खोल्यांचे घर देण्याची तयारी

 कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा आहे. काही जण मात्र त्यापलीकडे जाऊन सकारात्मक विचार करत आहेत. शहरातील हरिश्चंद्र मित्तल यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतःचे १६ खोल्यांचे घर उपलब्ध करण्याची तयारी दाखवली. मात्र त्या भागातील नागरिकांनी विरोध केल्याने हा प्रेरणादायी उपक्रम पूर्णत्वास जाईल की नाही याबद्दल साशंकता आहे. पण साधकबाधक विचार केल्यानंतरच यावर निर्णय होऊ शकतो, असे मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी म्हटले.

सतीश पेट्रोल पंपाच्या मागील शांतिनिकेतन कॉलनीतील आपले १६ खोल्यांचे घर कोविड सेंटर म्हणून वापरावे, अशी इच्छा मित्तल यांनी व्यक्त केली. यासाठी मनपा प्रशासनास पत्रव्यवहारही केला. मात्र ही माहिती कळताच कॉलनीतील नागरिकांनी याला तीव्र विरोध केला.

डॉक्टर पाडळकर म्हणाल्या की, शहरातील नागरिक अशा रीतीने पुढे येत असल्याने ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे. मात्र एखादे घर कोविड सेंटर म्हणून वापरण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. नुसते सेंटर उपलब्ध करून गरज थांबत नाही तर या ठिकाणी पूर्णवेळ सेवा देणारे डॉक्टर्स इतर कर्मचारी यांचीही सोय करावी लागेल. कारोनाविरुद्धची लढाई ही धावण्याची स्पर्धा नाही, तर ती मॅरेथॉन आहे. अजून बराच काळ आपल्याला काेरोनाशी लढायचे आहे.

शेजाऱ्यांची भीती स्वाभाविक, मनपाने विचार करावा लोकांना कोरोनामुक्त करण्यासाठी माझे घर वापरले जावे, अशी माझी इच्छा आहे. यासाठी मी मनपा प्रशासनाला पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यांचेही बरोबर आहे. शेवटी त्यांनाही जिवाची भीती असणे स्वाभाविक आहे. तरी मनपाने यावर विचार करावा. - हरिश्चंद्र मित्तल

0