आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडींचा शहरात जल्लोष:सेलिब्रिटींसह तानाजी मालुसरे यांच्या वंशजाची हजेरी; आमदार अंबादास दानवेंनी धरला ठेका

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीची धुम असून गोपाळकाला निमित्त आज सायंकाळपासून शहरात ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवरायांचे खंदे मावळे तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह सिलेब्रेटींनी हजेरी लावली. एका दहीहंडी कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आमदार अंबादास दानवेंनी चांगलाच ठेका घेतला होता.

गुलमंडी, औरंगपुरा, कोकणवाडी, सिडको कॅनॉट प्लेस, हडको आदी भागांमध्ये युवकांनी उत्साहात दहिहंडीत सहभाग घेतला. तर या कार्यक्रमांमध्ये चित्रपट व मालिकेतील अभिनेते अभिनेत्रींसह तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांनीही हजेरी लावली होती.

मोठ्या उत्साहात शहरातील विविध भागांमध्ये गोविंदा पथकांसह आबालवृद्धांनी दहीहंडी पाण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील विविध गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी व मनोरे तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते तर त्यांना पाहण्यासाठी विशेष करून कॅनॉट परिसरामध्ये युवकांनी मोठी गर्दी केली होती .तर हडको परिसरात युवकांसह आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

अंबादास दानवेंनी धरला ठेका

शहरात एकीकडे दहिहंडीचा थरार सुरु असताना हडकोतही दहिहंडीद्वारे आनंदाला उधान आले. टीव्ही सेंटर येथील दहीहंडी कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी गोविंदा पथक व युवकांसोबत डिजेवर डान्स केला. यावेळी सर्वांचाच उत्साह वाखण्याजोगा होता.

सिडको कॅनॉट प्लेससह ठिकठिकाणी दहिहंडीचे आयोजन आज करण्यात आले. शिंदे-भाजप सरकारने दहिहंडीच्या नियमांत सुट दिली. याशिवाय गोविंदांसाठी योजना आणि विमा कवचही दिल्याने यंदा जन्माष्टमीला चार चांद लागले. यातच युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. युवकांसह आबालाविरुद्ध दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आले होते. मोठ्या उत्साहात शहरातील विविध भागांमध्ये गोविंदा पथकांसह आबालवृद्धांनी दहीहंडी पाण्यासाठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...