आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:स्काऊट गाइड जिल्हा संस्थेत एकदिवसीय संघनायक मेळावा ; स्काऊट व गायडर सहभागी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत स्काऊट आणि गाइड जिल्हा संस्थेत नुकताच एकदिवसीय संघनायक मेळावा झाला. या मेळाव्यात विविध शाळांतील स्काऊट, गाइड स्काऊट व गायडर सहभागी झाले होते. शिक्षण विस्ताराधिकारी कल्पना पदकोंडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले, तर शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुकर घोडके, वैशाली आठवले, प्रिया आधाने, श्रीनिवास मुरकुटे, रेखा पानसरे, शुभांगी पांगारकर, गुलाब पवार यांनी काम पाहिले. स्काऊट आणि गाइड यांना प्रवेश अभ्यासक्रमांबाबत माहिती देऊन कृतियुक्त गाणी, मैदानी खेळ, मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. या वेळी उपशिक्षणाधिकारी अशोक पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी विद्या दीक्षित, मनीषा वाशिंबे, सीताराम पवार, स्नेहलता हिवर्डे आदींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. सर्व स्काऊट आणि गाइड यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय घुसिंगे, दिनेश मिसाळ, ज्योत्स्ना पिंपरीकर, हरचंद जारवाल आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...