आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पोस्टरबाजी:एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या इच्छा पल्लवीत

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारला असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आशा इच्छा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील केंब्रिज स्कूल चौकात मोठा बॅनर लावत विठू माऊलीला साकडे घालत देवेंद्रजी यांना मुख्यमंत्री होऊ दे व पूजेसाठी येऊ दे या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे त्या बॅनरने या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधले आहे.

शिंदेची बंडखोरी

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याच पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उंचावला आहे. आपल्यासोबत एक मोठा गट आमदारांचा घेऊन भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करा, अशी भूमिका घेतल्याने एकीकडे शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आले आहे. अशा परिस्थितीत भाजपा कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट करत नसल्याचे दाखवत आहे. असे असले तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशा आशा जागृत झाल्या आहेत.

केंब्रिज स्कूलजवळ बॅनरबाजी

एकीकडे भाजप सावध भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्ते मात्र, भाजप सरकार सत्तेत येईल या भावनेने पोस्टर झळकावत आहेत. शहरातील केंब्रिज स्कूलजवळ एक भाजप कार्यकर्त्याने मोठा बॅनर लावत त्या बॅनर वर लिहिले आहे की, "हे विठू माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे" तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री देवेंद्रजी येऊ दे. अशा ठळक अक्षरात बॅनर लावला आहे. त्यामुळे तो बॅनर त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.