आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या गटाचे 11 तर भाजपाचे २ आणि ठाकरे प्रणित शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीतील या यशाचे श्रेय आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत आहेत. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर करत पॅनल तयार करणाऱ्या आमदार शिरसाट यांनी 'शिंदे यांच्या नावाने' पॅनल तयार करून लढायला हवे होते; पण ती हिम्मत त्यांच्यात नाही. यंदा प्रथमच भाजपाला एका जागेहून बढती मिळत दोन जागेवर सरशी करण्यात यश मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक भावना तयार झाल्याचे माजी महापौर बापू घडामोडे यांनी सांगितले.
काय म्हणाले नेते
भाजपा आणि शिंदेसेना युती करणार
वडगाव ग्रामपंचायतीवर विजय मिळविला. आता लक्ष पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर लागले आहे. पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणी सुरू असून पुढील निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढणार आहोत. असे मुख्यमंत्री शिंदे गटातील मुख्यमंत्री आमदार संजय शिरसाट म्हणाले.
आम्ही 'बाजीगर' ठरलोत
जर आकड्यांची जुळवाजुळव महत्वाची असेल तर ते 16 जागेवरून आता 11 जागेवर आले आहेत. तर केवळ 11 जागा लढवणारी निष्ठावंत शिवसेना 4 जागेवर विजयी झाली. त्यात त्यांच्या एका मातब्बर सदस्याला आमच्या नवख्या तरुण उमेदवाराने धोबीपछाड केले. त्यामुळेच आमची हार होऊनही आम्ही बाजीगर ठरलो आहोत, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड म्हणाले.
आम्हाला भविष्यात संधी
केवळ एक जागा असणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये आता दोन जागेवर आमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात आम्हाला यश आलं आहे. भविष्यात आम्हाला इथे पक्ष वाढवण्यासाठी मोठी संधी दिसत आहे, असे मत माजी महापौर बापूर घडामोडे यांनी केले.
आघाडीला तिथं आणि इथंही नाकारलं
राज्यात महाविकास आघाडी करून लढणाऱ्या सरकारला तिथं नाकारल्याने आता सत्तांतर झाले. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढणाऱ्या शिवसेनेला जनतेने या ठिकाणीही नाकारले आहे आणि शिंदेसेनेच्या हाती सत्ता सोपवली, असे मत राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.