आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फसवणुकीचा गुन्हा:दुचाकीवर पत्नीच्या मोपेडचा क्रमांक टाकणाऱ्यावर गुन्हा; पासिंगला उशीर झाल्याने दंड टाळण्यासाठी लढवली शक्कल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी विकत घेतल्यानंतर आरटीओतून पासिंगला उशीर झाल्याने अधिकचा दंड भरायचा कंटाळा आल्याने विजय लक्ष्मण हिरे पाटील (४०, रा. शिवनेरी कॉलनी, गारखेडा परिसर) हा व्यापारी स्प्लेंडर दुचाकीवर पत्नीच्या अॅक्टिव्हाचा क्रमांक टाकून फिरत होता. अखेर गुरुवारी नाकेबंदीत ताे पकडला गेला आणि पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शहरात दुचाकी चोरी, घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक पोलिस, गस्तीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांची ई-चालान मशीनमध्ये खातरजमा करून माहिती काढली जाते.

यात आतापर्यंत तीसपेक्षा जास्त जण पकडले गेले. कुणी चोरीच्या दुचाकीवर दुसऱ्याच दुचाकीचा क्रमांक टाकतो, तर कुणी कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीचा ससेमिरा चुकवण्यासाठी अशी शक्कल लढवताना सापडले. गुरुवारी गुन्हे शाखेचे कर्मचारी संजयसिंग राजपूत हे चिकलठाण्यात गस्तीवर होते. त्यांनी हिरेची दुचाकी थांबवून कागदपत्रे मागितली. मात्र, त्याने नकार दिला. ई-चालान मशीनमध्ये त्याच्या दुचाकीवरील क्रमांक अॅक्टिव्हाचा निघाला. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. याप्रकरणी त्याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...