आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ आपले म्हणणे इतरांवर लादण्यापेक्षा मतदारांची मन:स्थिती जाणून घेऊन काम करण्याचा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी औरंगाबाद कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या दिला. शहरातील आयएमए सभागृहात आयोजित लोकसभा प्रवास अभियान बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात राबवण्याच्या कार्यक्रमांची माहिती दिली. वर्षभरात आगामी काळात पन्नासवर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. येती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.
लोकसभेच्या राज्यात १८ अतिरिक्त जागा भाजप लढवणार असून त्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. नेमके काय करावे, बुथ विभागणी कशी करावी, कुठले कार्यक्रम हाती घ्यावे, यासंबंधी नड्डा यांनी मार्गदर्शन केले. दलित वस्तींमध्ये पदाधिकाऱ्यांनी जावे असे त्यांनी आवर्जून सांगितले. समाजातील छोट्या छोट्या घटकांशी संपर्क ठेवून त्यांना पक्षाशी जोडावे. नेत्यांची व कार्यकर्त्यांच्या वर्तणूक कशी असावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येकाची मनस्थिती जाणून घ्या. त्यांच्या अडीअडचणी काय आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा आणि त्या कशा सोडवल्या जातील यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी पदाधिकारी यांना दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.