आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:अधिकारी साहेब, वयोवृद्धांना तरसवू नका;किमान पाच तारखेपर्यंत तरी पेन्शन देत जा

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जि.प.पेन्शनर्स असोसिएशनची जिल्हा परिषदेकडे विनंती

'अधिकारी साहेब आम्ही आयुष्यभर प्रशासनाची सेवा केली, आता आयूष्याच्या उतरत्या काळात आम्हाला समाधानाने जगू द्या, आमच्या हक्काची पेन्शन वेळेवर मिळू द्या' अशी विनंती औरंगाबाद जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व पेन्शनर्स यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. एप्रिल महिन्याची २२ आली आहे. तरीदेखील मार्च महिन्याची पेन्शन त्यांच्या मिळालेली नाही. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळाली नाही तरी चालले पण किमान ५ तारखेपर्यंत तरी हक्काची पेन्शन आम्हाला देत जा' अशी विनंती या ज्येष्ठांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांच्याकडे केलेल्या या विनंती अर्जात पेन्शनर्स असोसिएशनमार्फत ज्येष्ठ नागरिकांनी आपली व्यथा मांडली असून, जिल्हा परिषदेचे सर्व सेवानिवृत्तांना २२ एप्रिल उजाडला तरीदेखील मार्च महिन्याहे निवृत्तीवेतन प्राप्त झालेले नाही. कधी बजेटच नाही तर कधी पगारबिलाच्या फायली अधिकारी यांचे टेबलावर केवळ सहीसाठी पडून असतात. गेल्या दोन वर्षापासून हा विलंब सुरु असल्याचे असोसिएशनने म्हंटले आहे. १ तारखेला आमची पेन्शन करा, आमचा तसा आग्रहदेखील नाही, किमान महिन्याच्या ५ तारखेच्या आत तरी हक्काची पेन्शन हातात पडू द्या असा आग्रह त्यांनी केला आहे. प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिले जात नाही. अनेकवेळा फोनदेखील उचलले जात नसल्याची खंत असोसिएशनने व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिक्षण अधिकारी व सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून निवृत्ती वेतन देयके वेळेवर वित्त विभागामध्ये दाखल केली जात नाहीत. वित्त विभागातून एक किंवा दोन दिवसात बिल दाखल झाल्यानंतर आरटीजीएस केले जाते असे वित्त व लेखाधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी म्हंटले आहे. समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदवले यांनी दिले आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाचा विसर !
विभागीय आयुक्तांनी या दोन वर्षात दोनवेळा जिल्हा परिषद प्रशासनाला पेन्शनर्सचे निवृत्तीवेतन वेळेवर करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र या आदेशाचा जिल्हा परिषद प्रशासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. हा त्यांच्या आदेशाचा अवमान केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष वसंत सबनीस, विकास बाविस्कर यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...