आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:सेनगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी कोरोनाबाधित, कारभार आता नर्सी पोलिस ठाण्यातून पाहिला जाणार

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील सेनगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर गुरुवारी (ता. २०) पोलिस ठाणे निर्जंतुकीकरण करून बंद करण्यात आले आहे. आता सेनगाव पोलिस ठाण्याचा कारभार नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातून पाहिला जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयासह आता पोलिस दलातही शिरकाव केला आहे. सेनगाव पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर प्रकार पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांना कळविला आहे. त्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या शिवाय पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करून कामकाज बंद करण्यात आले आहे.

त्यानंतर आता सेनगाव पोलिस ठाण्याचा कारभार नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातून पाहिला जाणार आहे. सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६४ गावांतील गावकऱ्यांना तक्रारी व पोलिस ठाण्याच्या कामासाठी नर्सी नामदेव येथे यावे लागणार आहे. पुढील किमान दहा दिवस सेनगाव पोलिस ठाण्याचे कामकाज बंद राहण्याची शक्यता पोलिस विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.