आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतिक्षा यादी ऐवजी जुनीच नावे, यादीतील बहुतांश नावे अॅप्रोज न झालेल्या विद्यार्थ्यांचीच; शिक्षणाधिकारी कार्यालयाचा धक्कादायक प्रकार

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतीक्षा यादीतील विद़यार्थ्यांची नावे गेली कोठे, पालकांचा प्रश्न

आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी फेरी सुरू आहे. माञ, या यादीत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावेच नाहीत. यादीत चक्क सोडतीत पात्र ठरलेल्या परंतू प्रवेश न घेतलेल्या (नॉट ॲप्रोच) विद्यार्थ्यांची नावे असल्याचा धक्कादायक प्रकार पालक संघाने समोर आणला. शिक्षणाधिकारी कार्यालयाचा हा प्रताप शाळांच्या भल्यासाठी की, कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी ची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामध्ये ८ ऑक्टोबर पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर पर्यंत घेण्यात आली. यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले त्यामध्ये एकच सोडत घेण्यात आली त्यासह तेवढ्याच जागांसाठी सोबतच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. सोडत झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाही अशा रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याची प्रक्रियाही सुरू झाली परंतु औरंगाबाद जिल्ह़यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रतीक्षा यादीत पहिल्या यादीतील विद़यार्थ्यांचीच नावे आहेत. त्यामुळे त्याच पालकांना प्रवेशाचे मेसेज गेले. अनेक शाळांबाबत असे प्रकार घडल्याचे आरटीई पालक संघांने आरोप केला आहे. त्याबाबत आरटीई कक्ष प्रमुखांची मंगळवारी पालक संघाच्या अध्यक्षांनी भेट घेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीत नॉट ॲप्रोच असे दर्शविलेल्या विद्यार्थ्यांची नावे असल्याने पालकांना समजेनासे झाले नेमकी फेरी कोणासाठी. प्रतीक्षा यादीतील विद़यार्थ्यांसाठी प्रक्रिया असल्याने अनेक पालक शाळेत जात आहेत परंतु शाळा अशा पालकांना यादी दाखवते आणि परत पाठवते आहे.

औरंगाबाद जिल्ह़यात मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक पालकांनी तक्रारी करूनही शिक्षणाधिकारी कार्यालयाने कोणतीच काळजी घेतली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादी ऐवजी नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या यादी प्रसिद्ध झाल्याचा आरोप पालक संघाने केला आहे. शाळांच्या सोयीसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी काम करतात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चार हजार पैकी तीन हजार जागांवर प्रवेश झाले असून एक जागांसाठी प्रतीक्षा यादीतील िवद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. तर शिक्षण विभागातील आरटीई प्रवेश समन्वयक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने माहिती घेण्यात येईल.

ज्या पालकांच्या पाल्याचे नंबर पहिल्या यादीत आले नाहीत. त्यांना प्रतिक्षा यादीतून अपेक्षा होत्या. परंतु प्रतिक्षा यादीतही गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. याची माहिती शिक्षण विभागातही अधिकाऱ्यांना पालकांनी दिली.- प्रशांत साठे पालक संघाचे अध्यक्ष आणि समााजिक कार्यकर्ता

बातम्या आणखी आहेत...