आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर:रुग्णांचे हाल; घाटी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी घाटीत दाखल

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(घाटी) आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, घाटीत 210 नर्स विद्यार्थीनी दाखल झाल्या आहेत. त्या मुळे संपाचा परिणाम सध्या झाला नसल्याचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांनी सागितले.

घाटीत मेट्रन ऑफिससमोर एकत्र येत परिचारिकांनी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत पेन्शन मिळाली पाहिजे अशी घोषणा यावेळी करण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. तर चतुर्थं श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले.संघटनेच्या इंदुमती थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महेंद्र सावळे, मकरंद उदयकार, द्रौपदी कर्डीले आदींची यावेळी उपस्थिती होती. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातही परिचारिका संपावर गेल्या आहेत.

अकोल्यातील सरकारी कर्मचारी संपावर:शिक्षण, आरोग्य सेवा प्रभावित; जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव धुडकावत सरकारी, निमरसकारी कर्मचारी मंगळवारी संपावर गेले. सरकारी-निमसरकारी कर्मचारी,जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणारी महानगरपालिका, नगरपालिका, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर असे जिल्ह्यातील हजाराे कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत रॅली काढली

बातम्या आणखी आहेत...